मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे-पाटील
By Appasaheb.patil | Published: September 24, 2022 08:54 PM2022-09-24T20:54:57+5:302022-09-24T20:57:58+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात सोलापूरच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय प्रवास हा शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा राहिला आहे. महाविकास आघाडीचा काळ सोडला तर सर्वच पक्षांच्या सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. पूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विखे-पाटील काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर जून २०१९ मध्ये ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी गृहनिर्माण, परिवहन, शिक्षण ही खाती सांभाळली आहेत. युतीच्या सरकारमध्ये ते कृषीमंत्रीही होते.
आता त्यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यामुळे रखडलेली विकासकामे मार्गी लागण्याची आशा आहे.
जाणून घ्या राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्री
- राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,
- सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
- चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
- विजयकुमार गावित- नंदुरबार,
- गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
- गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव
- दादा भुसे- नाशिक,
- संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
- सुरेश खाडे- सांगली,
- संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
- उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,
- तानाजी सावंत-परभणी,
- उस्मानाबाद (धाराशिव)
- रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
- अब्दुल सत्तार- हिंगोली,
- दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,
- अतुल सावे - जालना, बीड,
- शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,
- मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर