मोठी बातमी; दुधनीत जुगार अड्यावर धाड, काँग्रेसच्या तालुकाध्यक्षासह २० जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 01:04 PM2021-12-29T13:04:48+5:302021-12-29T13:05:39+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
अक्कलकोट : दुधनी (ता.अक्कलकोट) येथील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर अक्कलकोट काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रेंसह वीस जणांविरुद्ध दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि.२८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शांभवी हॉटेलमध्ये घडली आहे.
काँग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्यासह मन्सुर कादर पठाण, (वय ४५), सय्यद अजमेर शेख (वय ३१), शंकर सातलिंग गायकवाड (वय ४६, चौघे रा. दुधनी), श्रीमंत यल्लप्पा मिलगिले (वय ३५ रा.अक्कलकोट), शरणू महादेव क्यार (वय ३४, रा. मुगळी), काशिनाथ धोंडप्पा कल्लोळी, (वय ५१, रा. अफझलपूर, जि.गुलबर्गा), भूपेंद्र मन्नु राठोड (वय ३१, रा. बळोरगी ता. अफझलपूर), अर्जून तारासिंग चौहान (वय २०, रा.सण्णुर, जि.गुलबर्गा), बंदेनवाज अलीसाब सिंदगीकर (वय ५५,रा. सिंदगी, जि. विजयपूर), मुदकप्पा निंगप्पा मेत्री (वय ३५, रा. बडदाळ ता.अफझलपूर), विजयकुमार गुरप्पा घोळसार (वय : ५७ रा. अफझलपूर), मुंतजिब हसन शरीफ (वय ५५, रा.गुलबर्गा), भगवानसिंग सुरसिंग ठाकूर, (वय ३३, रा. जेवरगी कॉलनी, जि. गुलबर्गा), इमाम अमीर शेख (वय ३०, रा. कोगणूर ता. अफझलपूर), मल्लना सिध्दण्णा गौड (वय ५०, रा. सिंदगी, जि. विजयपूर), कर्नाटक, राजू हसनसाब रेवूर (वय २५, रा. वडदाळ, ता. अफजलपूर), शिवाजी धनसिंग राठोड (वय ३२,रा. बळोरगी, ता.अफजलपुर), उमेश भिमशा अधिमनी (वय२९, रा. गोबूर (बी), ता. अफजलपूर), पुंडलिक शिवप्पा आलमेलकर (वय ३०, रा. आलमेल, जि. विजयपूर) असे त्या जुगार खेळणार्या आरोपींची नावे आहेत.
सर्वजण मिळून दुधनी येथील शांभवी हॉटेलमधील एका रुममध्ये जुगार नावाचा पत्याचा खेळ खेळत असल्याची मािहती साेलापूर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने धाड टाकली. त्याठिकाणी जुगार नावाचा पत्त्याचा डाव खेळत असताना रोख २ लाख, ५७ हजार, ८४० रुपयासह ५२ पत्याचा डाव, १५ मोबाईल हॅन्डसेट व ३ मोटार सायकल असे एकूण ४ लाख, ९८ हजार, ३५० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलीस नाईक रवि सुनिल माने (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोसई छबू बेरड हे करीत आहेत.