मोठी बातमी; सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश काळे दोन वर्षासाठी तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 11:43 AM2021-12-08T11:43:16+5:302021-12-08T11:43:35+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे उपमहापौर राजेश काळे यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास दिली.
सोलापूर शहर पोलीस दलाचे पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, उपमहापौर राजेश काळे यांच्यावर सात गुन्हे दाखल होते. त्यांना सोलापूर, उस्मानाबाद, इंदापूर येथून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले तर सेटलमेंट भागातील रहिवासी चेतन नागेश गायकवाड यांनाही दोन वर्षासाठी सोलापूर, उस्मानाबाद, इंदापूर येथून तडीपार करण्यात आले आहे. त्यांच्यावर खून खुनाचे प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.
चेतन गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र आहेत. तर उपमहापौर राजेश काळे भारतीय जनता पार्टीचे निलंबित कार्यकर्ते आहेत.