मोठी बातमी; गुरसाळेच्या विठ्ठल कारखान्याची बॅक खाती सील; जाणून घ्या काय आहे नेमके कारण...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 11:11 AM2021-03-09T11:11:58+5:302021-03-09T11:12:10+5:30

15 कोटी जीएसटी थकविल्याप्रकरणी झाली कारवाई

Big news; Seal the back accounts of Gursale's Vitthal factory; Find out exactly what the reason is ...! | मोठी बातमी; गुरसाळेच्या विठ्ठल कारखान्याची बॅक खाती सील; जाणून घ्या काय आहे नेमके कारण...!

मोठी बातमी; गुरसाळेच्या विठ्ठल कारखान्याची बॅक खाती सील; जाणून घ्या काय आहे नेमके कारण...!

googlenewsNext

पंढरपूर : योग्य नियोजन व कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा बोजा यामुळे अडचणीत आसलेल्या गुरसाळे (ता. पंढरपुर ) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने जीएसटी ची जवळपास तब्बल १५ कोटींची रक्कम थकविल्या प्रकरणी जीएसटी सहआयुक्त कार्यालयाने सोलापूर जनता बँकेसह कारखान्याची इतर सर्व खाती सील केली आहेत. त्यामुळे कारखान्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. 

कारखान्याने साखर विकली मात्र त्या बदल्यात सेवाकर व जीएसटी ची रक्कम भरली नाही. याबाबत जीएसटी कार्यालयाने कारखान्यांसह बँकांना रीतसर नोटीस काढून कारखान्यांची सर्व खाती तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संचालक कामगार प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. 

कारखान्याकडे मागील हंगामातील विविध बँकासह शेतकऱ्याची शेकडो कोटींची देणी थकीत आहेत. चालू गळीत हंगामातील 20 डिसेंबरनंतर गाळप झालेल्या ऊसाची, वाहतूक, कामगार व इतर आशी जवळपास ७० कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. त्या रकमा शेतकऱ्यांना त्वरित देण्यात याव्यात यासाठी कारखान्याचे विद्यमान संचालक युवराज पाटील यांनी साखर आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

मागील या थकीत रकमा देण्यासाठी कारखाना प्रशासन धडपड करत असताना जीएसटी थकविल्या प्रकरणी झालेल्या या कारवाई मुळे नवीन अडचणीनिर्माण झाल्या आहेत. याविषयी अध्यक्ष भगीरथ भालके यांच्याशी संपर्क साधला असता ते मुबंईमध्ये आहेत असे सांगून आल्यावर बोलू म्हणाले तर उपाध्यक्ष लक्षमन पवार यांचा मोबाईल बंद होता. संचालक युवराज पाटील आम्हाला कोणत्याही कामात विश्वासात घेतले जात नसल्याने याबाबत आपणाला माहिती नाही मात्र  कारखान्यात सर्व काही आलबेल आहे. याबाबत आपण साखर आयुक्तांकडे तक्रार केली आसल्याचे त्यांनी सांगितले

Web Title: Big news; Seal the back accounts of Gursale's Vitthal factory; Find out exactly what the reason is ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.