मोठी बातमी; भाजप संपर्कातील पाटलांच्या गळ्यात शरद पवारांनी टाकला राष्ट्रवादीचा पंचा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 11:35 AM2023-05-07T11:35:40+5:302023-05-07T11:36:39+5:30
या प्रसंगी राष्ट्रवादीचे उमेश पाटील म्हणाले, सध्याच्या घडामोडी नंतर पवार साहेब आपण पहिल्यांदाच अभिजीत पाटील यांच्या कार्यक्रमाला आलात.
सचिन कांबळे
पंढरपूर : उप मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून भाजपाच्या संपर्कात असलेल्या विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी टाकला राष्ट्रवादीचा पंचा टाकला आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी नंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सीएनजी बायो गॅस प्रकल्पाचे भूमिपूजन व शेतकरी मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार रविवारी पंढरपुरात आले आहेत.
या प्रसंगी राष्ट्रवादीचे उमेश पाटील म्हणाले, सध्याच्या घडामोडी नंतर पवार साहेब आपण पहिल्यांदाच अभिजीत पाटील यांच्या कार्यक्रमाला आलात. जो मॅसेज जायचं तो मॅसेज जिल्ह्यात गेला आहे. आ. भारत भालके यांच्या निधनानंतर नंतर पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात पोकळी निर्माण झाली आहे. विठ्ठल परिवार पोरका झाला आहे. भाकरी करपली आहे. ती फिरवली पाहिजे सुरुवात आमच्या पासून करा. अभिजीत पाटील यांना आशीर्वाद देऊन तालुक्याचा विकास केला. तसेच दीपक साळुंखे पाटील यांनी काढलेला कारखाना बंद पडलेला कारखाना अभिजीत पाटील यांनी घेतला आणि चालवून दाखवला असे मत व्यक्त केले. त्यांनतर माजी आ. दीपक साळुंखे पाटील यांनी उत्तर देण्यासाठी आले. आणि मीच अभिजीत पाटील यांना सांगोलाचा कारखाना चावायला घ्या असे सांगितले. त्यानंतर अभिजीत पाटील यांनी कारखान्याच्या ऊस मोळी पुजनाला दरेकर यांना बोलावले होते. आणि आता शरद पवारांना बोलावले आहे. यामुळे राष्ट्रवादीचा पंचा अभिजीत पाटील यांच्या गळ्यात घालून लोकांचा संभ्रम दूर करा अशी पाटील व पवार यांच्याकडे मागणी केली. याचवेळी राष्ट्रवादीचा पंचा अभिजीत पाटील यांच्या गळ्यात शरद पवारांनी टाकून पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला.
दरम्यान, यावेळी आ. रोहीत पवार, धाराशीवचे खा. ओमराजे निंबाळकर, आ. बबनदादा शिंदे, आ. रविंद्र धंगेकर, आ. कैलास पाटील, आ. यशवंत माने, आ.संजयमामा शिंदे, माजी आ. दीपक साळुंखे-पाटील, माजी आ. राजन पाटील, धनाजी साठे, बळीराम साठे, उमेश पाटील, उत्तमराव जानकर, अजित जगताप, लतिफ तांबोळी, समाधान काळे, दीपक पवार उपस्थित होते.