मोठी बातमी; सोलापूर- हसन, पंढरपूर-दादरसह सिद्धेश्वर एक्स्प्रेस १ जुलैपासून सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 10:13 PM2021-06-25T22:13:41+5:302021-06-25T22:14:10+5:30
मध्य रेल्वे विभागातील ३० एक्स्प्रेस गाड्या १ जुलै पासून धावणार; जाणून घ्या; कोणत्या आहेत त्या गाड्या...
सोलापूर : मध्य रेल्वेने देशभर पसरलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी रेल्वे प्रवाशी गाड्या रद्द केल्या होत्या. अनलॉकला सुरुवात झाल्यामुळे आता विशेष एक्सप्रेस गाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर विभागातून धावणारी सिद्धेश्वर, सोलापूर- हसन, पंढरपूर-दादर गाड्यांसह अन्य २७ गाड्या एक जुलैपासून होणार आहेत या गाड्यांचे आरक्षण लवकरच सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. सद्यस्थिती कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य शासनाने राज्यातील निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सह रेल्वे एसटी बसेस पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान प्रवासा वेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने आता मध्य रेल्वे विभागातील महत्त्वाच्या व प्रवाशांचा प्रतिसाद पाहून विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यास सुरुवात केली आहे. एक जुलैपासून मध्य रेल्वे विभागातील 30 नव्या विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्या गाड्यांचं आरक्षण लवकर सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
-------------------------
या गाड्या १ जुलैपासून सुरू होणार
पुणे-नागपूर, नागपूर-पुणे, मुंबई-लातूर, लातूर-मुंबई मुंबई-सोलापूर, सोलापूर-मुंबई, मुंबई-बिदर, बिदर-मुंबई, दादर-साईनगर शिर्डी, साईनगर शिर्डी-दादर, दादर-साईनगर शिर्डी, साईनगर शिर्डी-दादर, कोल्हापूर- नागपूर, पुणे-नागपूर, नागपूर-पुणे, पुणे-अंजनी, अंजनी-पुणे, पुणे-अमरावती, अमरावती-पुणे, नागपूर-पुणे, पुणे-नागपूर, सोलापूर-हसन, हसन-सोलापूर, दादर-पंढरपूर, पंढरपूर-दादर, दादर-साईनगर, साईनगर-दादर या सर्व गाड्या पुढील आदेश येईपर्यत धावणार आहेत.