मोठी बातमी; सहा वाळू माफियांना पंढरपूर तालुक्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 06:01 PM2021-01-10T18:01:23+5:302021-01-10T18:02:07+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पंढरपूर : पंढरपूर शहर व तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रातून अनेक वाळू माफिया अवैध वाळू उपसा करतात. जलद श्रीमंत होत असल्याने वाळू कडे अनेक गुन्हेगार वळत आहेत. यामुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे. गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी ६ वाळू माफियांना पंढरपूर तालुक्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार हद्दपार केले असल्याचे सांगितले.
शहरातील सुरज विष्णू पवार ( रा. जुनी वडार गल्ली) महादेव बाळू काळे ( रा. जुनी वडार गल्ली), राजू उर्फ रामा तिम्मा बंदपट्टे ( रा. संतपेठ), लहू बाबू चव्हाण (रा. ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टी, पंढरपूर) तर ग्रामीण भागातील नागेश शिवाजी घोडके (रा. बोहाळी ,तालुका पंढरपूर) व ऋतिक उर्फ दादा अरुण लामकाने ( रा. पिराची कुरोली, ता. पंढरपूर) हे वारंवार वाळू चोरीचे गुन्हे करणारे सराईत आरोपी आहेत. यांना पंढरपूर तालुक्यातून हद्दपार करावे असा प्रस्ताव पोलीस प्रशासना कडून प्रांत अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तो प्रस्ताव मंजूर झाला असून वरील सहा जणांना आजपासून पंढरपूर तालुक्यातून हद्दपार करण्यात आले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.