मोठी बातमी; पंढरपुरातील व्यापाऱ्याच्या घरातून सोळा लाखांचे सोन्या- चांदीचे दागिने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 08:53 AM2020-12-24T08:53:45+5:302020-12-24T08:54:15+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पंढरपूर : पंढरपुरातील फर्निचरचे प्रसिद्ध व्यापारी अजित फडे यांच्या घरातून सोने, चांदी व रोख रक्कम मिळून एकूण १५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेल्याची घटना १ ते १३ डिसेंबर २०२० या कालावधीत घडली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात संजिवनी फडे यांनी तक्रार दिली आहे.
संजीवनी अजित फडे (वय ६०, रा. महावीर नगर, पंढरपूर) हे पंढरपुरातील फर्निचर चे प्रसिध्द व्यापारी आहेत. त्यांनी बेडच्या ड्रॉवरमध्ये सोने व चांदीचे दागिणे साडी मध्ये बांधून लपून ठेवले होते.
सोने, चांदीचे दागिणे, पितळीची भांडी व रोख रक्कम असा एकूण १५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी फडे यांची नजर चुकवून उघड्या घरात प्रवेश करून पळवून नेला आहे.
यामध्ये १२ लाख ६३ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे, २ लाख ३ हजार ७०० रुपये किमतीचे चांदीचे दागिणे व वस्तू, ९०० रुपयांच्या पितळाच्या समई व भांडी, १ हजार रुपये किंमतीचा कॅमेरा, ५०० रुपयांचा मोबाईल, ५० हजार रुपये किंमतीचा सोने मोती असलेला खंडेलवालचा सेट व ५० हजार रुपयाची रोख रक्कमेचा सहभाग आहे. चोरीची तक्रार प्राप्त होताच पो. नि. अरुण पवार, पो.उप.नि. राजेंद्र गाडेकर यांनी पथकासह घटना स्थळी भेट दिली.