मोठी बातमी; शेततळ्यात लपविलेले हातभट्टी दारूचे टयुब पाण्यात उतरून पोलिसांनी काढले

By Appasaheb.patil | Published: August 28, 2022 06:30 PM2022-08-28T18:30:45+5:302022-08-28T18:30:53+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

big news; The tubes of hand-baked liquor hidden in the farm were taken out by the police | मोठी बातमी; शेततळ्यात लपविलेले हातभट्टी दारूचे टयुब पाण्यात उतरून पोलिसांनी काढले

मोठी बातमी; शेततळ्यात लपविलेले हातभट्टी दारूचे टयुब पाण्यात उतरून पोलिसांनी काढले

googlenewsNext

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी दुपारच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुरप्पा तांडा येथील हातभट्टी अड्ड्यावर धाड टाकली. या धाडीत शेततळ्यामध्ये लपवून ठेवलेले हातभट्टी दारूने भरलेले रबरी ट्यूब पोलिसांनी पाण्यात उतरून बाहेर काढून जप्त केले. या कारवाईत २७० लिटर हातभट्टी दारू व चार हजार पाचशे लिटर रसायन जागीच नाश करण्यात आले.

सदरच्या कारवाईत एकूण रुपये १ लाख १८ हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विश्वनाथ फुलचंद पवार (रा. वरळेगाव, ता. द. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम, दुय्यम निरीक्षक सुनील पाटील, सुरेश झगडे, जवान प्रकाश सावंत, नंदकुमार वेळापुरे, वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक अ २ विभाग उषा किरण मिसाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी सोलापूर शहरातील ताई चौक ते स्वागत नगर या परिसरात पाळत ठेवली असता त्यांना एका बजाज कंपनीच्या ऑटो रिक्षा क्रमांक एमएच १३ बीव्ही ११७१ मधून हातभट्टीची वाहतूक होत असताना आढळून आल्याने त्यांनी सदर वाहन थांबून तपासणी केली असता त्यात प्लास्टिकच्या कॅनमधून एकूण ११० लिटर हातभट्टी दारू मिळून आली. ही कारवाई निरीक्षक अ विभाग एस. एस. फडतरे, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, सहायक दुय्यम निरीक्षक बिराजदार, चव्हाण व जवान शोएब बेगमपुरे व प्रियंका कुटे यांचे पथकाने केली आहे.

----------

रिक्षा चालक गेला पळून

या गुन्ह्यात ऑटो रिक्षा चालक हा जागेवरून पळून गेला असून वाहनात बसलेला वाहतूकदार हणमंतू नरेंद्र गुंडेटी (वय ३४, रा. अंबिकानगर, सोलापूर) यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून एक ऑटो रिक्षा व ११० लिटर हातभट्टी दारू असा एकूण १ लाख ३१ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. फरार ऑटो चालकाचा शोध घेण्यात येत असून, तपास दुय्यम निरीक्षक अ २ उषाकिरण मिसाळ ह्या करीत आहेत.

Web Title: big news; The tubes of hand-baked liquor hidden in the farm were taken out by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.