मोठी बातमी; पंढरपुरात ट्रक भरून गुटखा जप्त; गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
By Appasaheb.patil | Published: October 7, 2022 12:51 PM2022-10-07T12:51:52+5:302022-10-07T12:52:24+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पंढरपूर : कर्नाटक येथून टेंभुर्णीकडे गुटखा घेऊन जाणारा ट्रक अहिल्यादेवी पूलाजवळ पकडला असून यामध्ये अंदाजे ३० ते ४० लाखाच्या आसपास गुटखा असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सपोनि सी. व्ही. केंद्रे यांनी दिली.
कर्नाटक मधून आलेला लाखो रुपयांचा गुटखा सांगोला मार्गाने पंढरपूर शहरातील अहिल्या पूलाजवळील रस्त्यावरून जात असल्याची माहिती सपोनि सी. व्ही. केंद्रे यांना मिळाली. तत्काळ त्यांनी ही माहिती उप विभागीय पोलिस अधीक्षक विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना सांगून सपोनि सी. व्ही. केंद्रे यांनी संबंधित ठिकाणी भेट दिली.
यावेळी एम.एच. ०९ सीए ३६३० या क्रमांकाचा ट्रक संशयितरित्या जात असताना दिसून आला. त्यास अडवून तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याची पोती मिळून आली. त्याचबरोबर ट्रक चालक प्रकाश रेवाप्पा शेजाळे ( वय २१, भीमा तेलगाव, ता. दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर) याने हा गुटखा कर्नाटकातून आणल्याचे सांगितले.
पोलिसांनी ट्रक व ट्रकचालकास ताब्यात घेतले असून याबाबतची माहिती अन्न औषध प्रशासनाला कळविले आहे. या ट्रकमध्ये अंदाजे ३० ते ४० लाखाचा गुटखा आहे.
ही कामगिरी सपोनि. सी.व्ही. केंद्गे, दत्तात्रय आसबे, पोहेकॉ शरद कदम, सुरज हेंबाडे, बिपीनचंद्र ढेरे, राजेश गोसावी, पोना सुनिल बनसोडे, दादा माने, सुजित जाधव, समाधान माने, राकेश लोहार, सचिन हेंबाडे, सचिन इंगळे यांनी केली.