मोठी बातमी; आव्हे येथे बिबट्या सदृश्य प्राण्याकडून दोन महिन्याचे खोंड फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 03:31 PM2021-01-04T15:31:53+5:302021-01-04T16:02:02+5:30

पटवर्धन कुरोली :  आव्हे (ता पंढरपूर) येथील शेतकरी सदाशिव नाना पाटील यांचे दोन महिन्याच्या खोंडावर  बिबट्या सदृष्य प्राण्याने हल्ला करून अर्धवट ...

Big news; A two-month-old squirrel from a leopard-like animal at Awe | मोठी बातमी; आव्हे येथे बिबट्या सदृश्य प्राण्याकडून दोन महिन्याचे खोंड फस्त

मोठी बातमी; आव्हे येथे बिबट्या सदृश्य प्राण्याकडून दोन महिन्याचे खोंड फस्त

Next
ठळक मुद्देपहाटे पाच वाजता उठून पाहिले आसता हा प्रकार त्यांच्या लक्षात आलावनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून झालेला प्रकार सांगितलापटवर्धन कुरोली, शेवते, खेडभोसे, परिसरात या हिंस्र प्राण्याने शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले

पटवर्धन कुरोली :  आव्हे (ता पंढरपूर) येथील शेतकरी सदाशिव नाना पाटील यांचे दोन महिन्याच्या खोंडावर बिबट्या सदृष्य प्राण्याने हल्ला करून अर्धवट आवस्थेत खाऊन टाकले आहे. हा प्रकार रविवारी मध्यरात्री घडला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आव्हे येथील शेतकरी सदाशिव नाना पाटील यांची चार जर्शी कालवड, एक देशी गाय, म्हैस, एक रेडी लहान दोन महिन्याचे खिलार गाईचे खोंड अशी जनावरे बांधलेली होती. रात्री अकरा वाजता या जनावरांना वैरण टाकून पाटील घरात झोवण्यासाठी गेले होते. पहाटे पाच वाजता उठून पाहिले आसता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

दरम्यान,  त्यानंतर त्यांनी याविषयी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून झालेला प्रकार सांगितला तर अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणे गरजेचे असताना त्या परिसरात पायाचे ठसे दिसतात का? याचा शोध घ्या आणि मग आम्हाला फोन करा आसे उलट उत्तर आल्याने शेकऱ्याची पंचाईत झाली आहे. यापूर्वी ही पटवर्धन कुरोली, शेवते, खेडभोसे, परिसरात या हिंस्र प्राण्याने शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले करून जनावरे खाल्ली आहेत. आता पुन्हा हा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Big news; A two-month-old squirrel from a leopard-like animal at Awe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.