मोठी बातमी; वाळू चोरी करणाऱ्या पंढरपुरातील दोघांना सहा महिन्यांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 08:48 PM2021-04-03T20:48:22+5:302021-04-03T20:48:59+5:30

भीमा नदीच्या पात्रातून वाळू चोरी; ७ तालुक्यांतून हद्दपार

Big news; Two of the sand thieves were deported from Pandharpur for six months | मोठी बातमी; वाळू चोरी करणाऱ्या पंढरपुरातील दोघांना सहा महिन्यांसाठी हद्दपार

मोठी बातमी; वाळू चोरी करणाऱ्या पंढरपुरातील दोघांना सहा महिन्यांसाठी हद्दपार

Next

 

पंढरपूर : भीमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू चोरी करणाऱ्या दोघांना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, माढा, बार्शी या तालुक्यातून ६ महिन्यासाठी  हद्दपार करण्यात आले. रणजित सिद्धेश्वर थिटे (रा. संतपेठ, पंढरपूर) व विकास महादेव बंदपट्टे (रा. महात्मा फुले चौक, पंढरपूर) करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत.

रणजीत सिद्धेश्वर थिटे (रा. संतपेठ, पंढरपूर) हा त्याच्या साथीदारांसह शहरातील हद्दीतील वाळू चोरी करत असतो. त्याला अटक करून सुद्धा त्याला कायद्याचा धाक राहिलेला नाही. तो वाळू चोरी करून स्वतःच्या व साथीदारांच्या गरजा पुरवत होता. त्याच्या टोळी विषयी लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात दहशत आहे सध्या त्याची गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांमध्ये भर पडलेली आहे. 

आणि त्याच्यावर केलेली कारवाई अपुरी झाली आहे. त्याच्यावर तो किनी सार्वजनिक शांतता अबाधित ठेवणे देखील अवघड झाले आहे. तिच्याकडून शासकीय मालमत्तेेस होणाऱ्या नुकसानीस प्रतिबंध करणे शक्य होणार नाही. यामुळे टोळी प्रमुख रणजित सिद्धेश्वर थिटे (रा. संतपेठ, पंढरपूर) व विकास महादेव बंदपट्टे (रा. महात्मा फुले चौक, पंढरपूर) यांना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मोहोळ सांगोला माळशिरस मंगळवेढा माढा बार्शी या तालुक्यातून सहा महिन्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ प्रमाणे हद्दपार करण्यात आले.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण पवार,  पोलीस उप निरीक्षक राजेंद्र गाडेकर, पोलीस कर्मचारी सूरज हेंबाडे, बिपीन ढेरे, पोना गणेश पवार, शरद कदम, सुजित जाधव, सुनील बनसोडे, राजेश गोसावी यांनी केली आहे.

Web Title: Big news; Two of the sand thieves were deported from Pandharpur for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.