मोठी बातमी; पंढरपुरातील विठ्ठल मंदिर केवळ बारा तासच दर्शनासाठी खुले राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 11:55 AM2021-03-26T11:55:42+5:302021-03-26T11:55:45+5:30
सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचा परिणाम
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी कडक निर्बंध गुरुवारी जाहीर केले. यामध्येच पंढरपूरचे विठोबा मंदिर हे सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत केवळ बारा तासच दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध जाहीर केले. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे केवळ बारा तासच खुले करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार विठ्ठल मंदिर प्रशासनाने शुक्रवारपासून सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवणार असल्याचे सांगितले आहे. तर ऑनलाईन दर्शन बुकिंगची मर्यादा आता मंदिर प्रशासनाकडून कमी केली जाणार आहे.