भोसे गावात पोलिसांची मोठी कारवाई; तरूणाकडे सापडलं दीड लाखांचे अवैध मुद्देमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2022 12:31 PM2022-08-02T12:31:45+5:302022-08-02T12:32:02+5:30
भोसेत गांजा, गुटखा व पेट्रोल, डिझेल असे १ लाख २१ हजाराचे घबाड हाती
मंगळवेढा: मल्लिकार्जुन देशमुखे
भोसे (ता मंगळवेढा )येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर वास्तव्यास असणाऱ्या अक्षय बसवेश्वर पैलवान (वय २८ वर्षे) याच्या घरी पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने यांच्या टीमने छापा टाकला यावेळी पोलिसांना गांजा, गुटखा, बेकायदेशीर पेट्रोल, डिझेल साठा असे घबाड हाती लागले आहे. असा १ लाख २१ हजाराचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मंगळवेढा पोलीस ठाणेची हद्द मोठी असुन सीमेलगत कर्नाटक राज्य, सांगली जिल्हा, यांची हद्द लागुन आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने अवैद्य वस्तुचा वाहतुक व साठा होत असतो. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने यांच्या टीमने भोसे येथील अक्षय बसवेश्वर पैलवान याच्या घरी छापा टाकला असता गांजा, गुटखा, बेकायदेशीर पेट्रोल, डिझेल साठा असे घबाड हाती लागले आहे. असा १ लाख २१ हजाराचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणातील आरोपी पोलीसांच्या ताब्यात असुन सदर गुन्ह्याचा तपास सपोनि बापुराव पिंगळे हे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजितसिंह माने, सपोनि बापुराव पिंगळे, सपोफो अविनाश पाटील, पोहेकॉ सुनिल गायकवाड, पोहेकॉ हजरत पठाण, पोना बापुराव पवार, पोकॉ राजु आवटे, पोकॉ वैभव घायाळ यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी मदत केली आहे.