दोघांनी हात पकडले, एकानं खिशातून मोबाईलसह रोकड काढून तिघे पसार; गुन्हा दाखल
By विलास जळकोटकर | Updated: May 5, 2024 20:23 IST2024-05-05T20:22:58+5:302024-05-05T20:23:12+5:30
हत्तूर बायपास रोडवर दुचाकीस्वाराला लुटले

दोघांनी हात पकडले, एकानं खिशातून मोबाईलसह रोकड काढून तिघे पसार; गुन्हा दाखल
सोलापूर: दुपारच्यावेळी दुचाकीवरुन निघालेल्या दुचाकीस्वााराला अडवून तिघांपैकी दोघांनी त्याचे हात पकडले. दुसऱ्यानं खिशातून मोबाईलसह रोकड काढून धूम ठोकली. दुपारी ३:३० च्या सुमारास हत्तूर- केगाव बायपास रोडवरील डोणगाव पुलाच्या बाजूला ही घटना घडली. ज्ञानेश्वर राघो नरोडे (वय- २०, रा. रामनगर, ता. कन्नड, जि. संभाजी नगर) असे लुटल्या गेलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी हा दुचाकीवरुन हत्तूर -केगाव बायपास रोडवरुन जात असताना दुपारी ३:३० च्या सुमारास डोणगाव ब्रीजच्या रोडवर आला. अचानक २० ते २५ वयोगटाचे तिघे तरुण दुचाकीच्या आडवे येऊन दुचाकीस्वाराला अडवले. दोघांनी त्याचे हात पकडले आणि तिसऱ्याच्या दमदाटी करीत त्याच्या खिशातून मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन धूम ठोकली.
अचानक घडलेल्या या प्रकाराने दुचाकीस्वार गोंधळून गेला. त्यांनी इतरांच्या मदतीने सलगरवस्ती पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास फौजदार पवार करीत आहेत.