अट्टल बाईक चोर जेरबंद; पाच लाखांच्या १५ दुचाकी जप्त

By रवींद्र देशमुख | Published: June 6, 2024 04:53 PM2024-06-06T16:53:08+5:302024-06-06T16:53:29+5:30

त्या अट्टल चोरट्याकडून पाच लाखांच्या १५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. 

bike thief jailed; 15 two-wheelers worth five lakhs seized | अट्टल बाईक चोर जेरबंद; पाच लाखांच्या १५ दुचाकी जप्त

अट्टल बाईक चोर जेरबंद; पाच लाखांच्या १५ दुचाकी जप्त

सोलापूर : मोटारसायकल चोरी करणारा अट्टल चोरट्याला जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण पेालिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्या अट्टल चोरट्याकडून पाच लाखांच्या १५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. 

कुर्डुवाडी पोलीस ठाणे येथील एका गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकलवर ‍एक जण तीन रस्ता चौक, पंढरपूर येथे चोरलेली मोटार सायकल विक्रीसाठी येणार आहे. तसेच तो अंगाने जाड त्याचे अंगावर फिकट गुलाबी रंगाचे शर्ट व काळपट रंगाची पॅन्ट घातलेला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावला. मोटारसायकलबाबत विचारपूस करीत असताना पोलिसांनी त्यास पकडले. पकडून अधिकची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सोलापूर, अहमदनगर, पुणे, धाराशिव व कोल्हापूर येथुन चोरलेले एकुण १४ मोटार सायकली जप्त केल्या. 

ही कामगिरी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांच्या मदतीने पोलीस उप-निरीक्षक सुबोध जमदाडे, पोलीस उप-निरीक्षक रविराज कांबळे, सपोफौ श्रीकांत गायकवाड, सपोफौ महमद इसाक मुजावर, पोहेकॉ सलीम बागवान, विजयकुमार भरले, रवि माने, पोना धनराज गायकवाड, पोकॉ अनवर अत्तार, सुरज रामगुडे, विनायक घोरपडे, चापोकॉ सतीश बुरकुल यांनी बजवली आहे.
 

Web Title: bike thief jailed; 15 two-wheelers worth five lakhs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.