बिल भरून घेतले ट्रान्स्फॉर्मर बिघडला, दुरुस्तीअभावी वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:21 AM2021-05-16T04:21:39+5:302021-05-16T04:21:39+5:30

वीजबिल थकबाकी वाढल्याने संपूर्ण शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद केला होता. हा खेळ महिनाभर सुरू होता. याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला. ...

Bill paid transformer malfunction, power outage due to lack of repair | बिल भरून घेतले ट्रान्स्फॉर्मर बिघडला, दुरुस्तीअभावी वीज खंडित

बिल भरून घेतले ट्रान्स्फॉर्मर बिघडला, दुरुस्तीअभावी वीज खंडित

Next

वीजबिल थकबाकी वाढल्याने संपूर्ण शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद केला होता. हा खेळ महिनाभर सुरू होता. याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला. शेतकऱ्यांनी पैसे भरले तेव्हाच वीजपुरवठा सुरू केला. आता तरी वीजपुरवठा सुरळीत चालेल, असे वाटत होते. मात्र दररोज बिघाड असल्याचे कारण सांगत सबस्टेशनमधून वीजपुरवठा बंद केला जात आहे. यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस, जनावरांची वैरण करपली आहे.

धरणे आंदोलन करणार

बीबीदारफळ येथील उपविभागीय कार्यालयासमोर येत्या गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्र छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील व जनहित शेतकरी संघटनेने तालुकाध्यक्ष शशिकांत थोरात यांनी अधीक्षक अभियंत्यांना पाठविले आहे. दिवसपाळीत सलग तासभरही वीजपुरवठा सुरू राहत नाही. वीज आली की मोटार सुरू करून पाईपलाईनमधून पाणी बाहेर पडेपर्यंत वीज गेलेली असते.

कोट

::::::::

१५-१५ मिनिटाला वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे पिके कशी टिकणार. कारंबा कार्यालयाचे अभियंता व तालुका उपअभियंता फोन उचलत नाहीत. सबस्टेशनमध्ये तर फोनच नाही.

- सतीश सर्वगोड,

शेतकरी, बीबीदारफळ

फोटो

१५बीबीदारफळ

ओळी

बीबीदारफळ परिसरात पाणी असूनही केवळ वीजपुरवठा खंडित झाल्याने विजेअभावी पिके करपू लागल्याचे दिसून येत आहेत.

Web Title: Bill paid transformer malfunction, power outage due to lack of repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.