मंगळवेढ्यातील जंगलगी परिसरात ‘बर्ड फ्लू’चा अलर्ट झोन; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 11:17 AM2021-01-15T11:17:18+5:302021-01-15T11:17:47+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील जंगलगी येथील पोल्ट्री फार्ममधील नऊ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने, या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप येणे बाकी असून या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू सदृश रोगाने झाल्याचे निश्चित झाले आहे.
त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून जंगलगीपासून दहा किलोमीटरचा
परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. राज्यात परभणी व लातूर या ठिकाणी बर्ड पलू दाखल झाल्यानंतर पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवेढा तालुक्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाने सर्व पोल्ट्री फार्म परिसरातील कोंबडयांची नियमित तपासणी करावी. कांबड्यांचा मृत्यू आढळल्यास नियंत्रण कक्षाला माहिती यावी, कुकुट पालकांनी
मेलेल्या कोंबड्यांचा किंवा आजारी पक्ष्यांची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना व नियंत्रण कक्षाला द्यावी, जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचान्यांनी सर्व पोल्ट्री फार्म तसेच परिसरातील कुकुटपालन करणाऱ्या शेतकयांना भेटी देऊन पक्षांची संख्या, पक्षांमधील मृत्यूची संख्या यांची माहिती घ्यावी, याबाबतचा सात दिवसांच्या कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहे.