जंगलगीतील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:20 AM2021-01-17T04:20:26+5:302021-01-17T04:20:26+5:30
या परिसरातून इतर परिसरात याची लागण होऊ नये यासाठी जंगलगीपासून एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या रविवारी नष्ट केल्या ...
या परिसरातून इतर परिसरात याची लागण होऊ नये यासाठी जंगलगीपासून एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या रविवारी नष्ट केल्या जाणार आहेत. शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने या कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
या परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या व पोल्ट्रीफार्मवरील कोंबड्यांना पाण्यातून भूल देऊन जेसीबी खड्डा करून शास्त्रयुक्त पद्धतीने नष्ट केल्या जाणार आहेत. या परिसरातील पोल्ट्रीफार्ममधील आणि शेतकऱ्यांच्या पाळीव कोंबड्या अंडी व पिलांना त्याच्या पद्धतीच्या वर्गवारीनुसार भरपाई शासन देणार आहे. यासाठी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी पक्षी नष्ट करण्यासाठी सर्व तयारी केली आहे. यासाठी सर्व मेडिकल औषधे, लागणारे साहित्य पीपी किटही तयार ठेवले आहेत.
कोट
प्रत्येक शेतकऱ्याने आपला पोल्ट्रीफार्म हाऊस शासनाकडे रजिस्टर करणे गरजेचे आहे. त्यानुसारच विविध रोगांची माहिती लगेच मिळते. त्यामुळे इतर आसपास परिसरात पक्षाला आजार होत नाही. प्रत्येक शेतकऱ्याने पोल्ट्रीफार्म हाऊस शासन दरबारी रजिस्टर करणे ही काळाची गरज आहे.
- डॉ. एन. एल. नरळे,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
कोट
मृत्यू पावलेल्या पक्ष्यांचे नमुने पुणे व भोपाळ येथे पाठवले होते. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जंगलगी येथील एक किलोमीटर असणाऱ्या परिसरातील सर्व कोंबड्या उद्या नष्ट केले जाणार आहेत.
- उदयसिंह भोसले,
प्रांताधिकारी,मंगळवेढा