महापालिकेत भाजप ठरले भारी; महाआघाडीचा काँग्रेस, वंचितला झाला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 11:06 AM2020-12-23T11:06:17+5:302020-12-23T11:06:22+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

BJP became heavy in the Municipal Corporation; The Congress of the Grand Alliance benefited the deprived | महापालिकेत भाजप ठरले भारी; महाआघाडीचा काँग्रेस, वंचितला झाला फायदा

महापालिकेत भाजप ठरले भारी; महाआघाडीचा काँग्रेस, वंचितला झाला फायदा

Next

सोलापूर : महापालिकेत भाजपशी युती केल्यानंतर शिवसेनेला महिला बालकल्याण समितीसह इतर तीन समित्या मिळायच्या. परंतु, मंगळवारी झालेल्या निवडीत सेनेला चिठ्ठीव्दारे काढलेल्या निकालात एक समिती मिळाली. काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीला मात्र महाआघाडीचा फायदा झाल्याचे दिसून आले. 


पालिकेत भाजपची सत्ता असली तरी सात विषय समित्यांमध्ये भाजप अल्पमतात आहे. या समित्या ताब्यात घेण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी महाआघाडी केली. राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे यांनी यांनी पालिकेत येऊन एक बैठक घेतली. त्यामुळे आघाडीला तीन समित्या मिळाल्या. मात्र सेनेच्या पदरी मोठी निराशा आली.


काँग्रेसचे काही नगरसेवक महाआघाडीसाठी तयार नव्हते. शिवसेनेत गटबाजी उफाळली होती. एमआयएममध्ये पूर्वीपासून गोंधळाचे वातावरण होते. या पुरेपूर फायदा भाजपने घेतला. आमदार विजयकुमार देशमुख यांनी शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे, नगरसेविका अनिता मगर, ज्योती खटके यांना आपल्या बाजूने वळविले. भाजपच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या एका नगरसेविकेला 'मॅनेज' केले. त्यामुळे महिला व बालकल्याण समितीसह चार समित्या भाजपकडे राहिल्या. आजवरच्या निवडीत ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांची भूमिका महत्त्वाची असायची. परंतु, या निवडीतील भाजपची काही सुत्रे माजी नगरसेवक अनंत जाधव यांच्या सात रस्ता येथील बंगल्यावरु फिरल्याचे दिसून आले. 

असे झाले मतदान

कामगार कल्याण समितीमध्ये गायकवाड आणि मुटकिरी यांना प्रत्येकी चार मते मिळाली. एमआयएमचे अजहर हुंडेकरी गैरहजर राहिले. चिठ्ठी काढण्यात आली. त्यात गायकवाड विजयी झाले. शहर सुधारणा समितीमध्ये शिवसेनेचे राजकुमार हंचाटे यांनी भाजपला मतदान केले. आरोग्य समितीमध्ये शिवसेनेच्या मगर यांना भाजपने साथ दिली. विधी समितीमध्ये देवी झाडबुके यांना ४ तर भोसले यांना तीन मते मिळाली. सेनेच्या ज्योती खटके यांनी ऑनलाइन हजर राहूनही मतदान केले नाही तर एमआयएमच्या वाहिदाबानो शेख गैरहजर राहिल्या. महिला व बालकल्याण समितीमध्ये एमआयएमच्या तस्लीम शेख यांनी भाजपला मतदान केले. 
 

समित्यांमधील संख्याबळ पाहता आमच्यासमोर आव्हान होते. महाआघाडीने तर आम्हाला एकही समिती मिळणार नाही असा दावा केला होता. परंतु, विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनाही भाजपवर विश्वास असल्याचे आजच्या निवडीतून स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपची सत्ता राहील. 
- विक्रम देशमुख, शहराध्यक्ष, भाजप.  


बोमड्याल यांची खंत 

भाजपचे नगरसेवक अविनाश बोमड्याल यांचा मंड्या नि उद्यान समितीच्या निवडीत पराभव झाला. बोमड्याल हे कोठे परिवाराचे जावई आहेत. बोमड्याल म्हणाले, शहर मध्य विधानसभेच्या निवडणुकीत भाजप नेत्यांचा आदेश डावलून आमच्या कुटूंबाने महेश कोठे यांचा प्रचार केला. मंड्या नि उद्यान समितीमध्ये प्रथमेश कोठे आणि कोठे गटाच्या मंदाकिनी पवार यांचा समावेश आहे. आम्ही पक्ष आदेश डावलून आजवर कोठे यांचे काम केले. परंतु, कोठे परिवार आमच्या मदतीला आला नाही.

Web Title: BJP became heavy in the Municipal Corporation; The Congress of the Grand Alliance benefited the deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.