उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी; सुभाष देशमुख गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 01:53 PM2021-01-13T13:53:33+5:302021-01-13T13:53:58+5:30

सोलापूर  : वादग्रस्त उपमहापौर राजेश काळे यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काळे हे आमदार ...

BJP expels Deputy Mayor Rajesh Kale; Subhash Deshmukh Group office bearers made the announcement | उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी; सुभाष देशमुख गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली घोषणा

उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी; सुभाष देशमुख गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली घोषणा

Next

सोलापूर  : वादग्रस्त उपमहापौर राजेश काळे यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काळे हे आमदार सुभाष देशमुख गटाचे आहेत. या गटाचे कार्यकर्ते आणि भाजपाचे शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी याबाबतची घोषणा केली.

महापालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून खंडणी मागितल्या प्रकरणी राजेश काळे यांना अटक करण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी काळे यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनीही अहवाल पाठवला होता. पक्षाचे निरीक्षक मकरंद देशपांडे यांनी सोलापुरात येऊन या प्रकरणाची माहिती घेतली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अहवाल पाठवण्यात आला. प्रदेश भाजपने काळे यांची हकालपट्टी. झाल्याचे जाहीर केले.

 

Web Title: BJP expels Deputy Mayor Rajesh Kale; Subhash Deshmukh Group office bearers made the announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.