आवताडे यांना भाजपचे अधिकृत पत्र दिले, आता भोसलेंची समजूत काढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:11 AM2021-03-30T04:11:59+5:302021-03-30T04:11:59+5:30

भारतीय जनता पक्षाचे बाळाभाऊ भेगडे यांची सोमवारी पंढरपुरात पत्रकार परिषद झाली. यादरम्यान ते बोलत होते. या वेळी उमेदवार समाधान ...

BJP gave an official letter to Avtade, now let's get Bhosale's understanding | आवताडे यांना भाजपचे अधिकृत पत्र दिले, आता भोसलेंची समजूत काढू

आवताडे यांना भाजपचे अधिकृत पत्र दिले, आता भोसलेंची समजूत काढू

Next

भारतीय जनता पक्षाचे बाळाभाऊ भेगडे यांची सोमवारी पंढरपुरात पत्रकार परिषद झाली. यादरम्यान ते बोलत होते. या वेळी उमेदवार समाधान आवताडे, आमदार प्रशांत परिचारक, माजी पालक मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील, श्रीकांत देशमुख, भास्कर कसगावडे, चांगदेव कांबळे, विनोद लटके, बादल ठाकूर आदी उपस्थित होते.

या वेळी बाळाभाऊ भेगडे म्हणाले, महाविकास आघाडीने पंढरपूर शहरात कोणत्याही नव्या योजना दिल्या नाहीत. हे सरकार खंडणी गोळा करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहते. शेतकरी व सामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहणारे हे सरकार नसल्याची टीका भेगडे यांनी केली.

तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २५२ पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची निवडणूक प्रमुखपदी तर उमेश परिचारक यांची उमेदवार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली असल्याचे सोलापूर जिल्हा बूथ अभियान प्रभारी बाळाभाऊ भेगडे यांनी सांगितले. त्याचबरोबर आ. प्रशांत परिचारक यांच्या विकास आघाडीतील नागेश भोसले यांनीदेखील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विकत घेतला आहे. भाजपच्या मतांची विभागणी होऊ नये, यासाठी भोसले यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. याबाबत भोसले सकारात्मक निर्णय जाहीर करतील, असे भेगडे यांनी सांगितले.

अर्ज भरण्यासाठी हे दिग्गज पंढरीत

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, श्रीकांत भारती, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी मंत्री सदाभाऊ खोत, प्रा. राम शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील, आ. गोपीचंद पडळकर, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, राजाभाऊ सरवदे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.

रोंगेंना तयारी ठेवा, असे सांगितले होते

आ. प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, डॉ. बी. पी. रोंगे व अभिजित पाटील यांनी पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. यादरम्यान डॉ. बी. पी. रोंगे यांना भाजपकडून अधिकृत उमेदवार ठरत नाही तोपर्यंत कागदोपत्री तयारी ठेवा, असे सांगितले होते. परंतु आता भाजपचा उमेदवार ठरला; यामुळे ते अर्ज काढतील, असे विश्वासू वृत्त डॉ. रोंगेंविषयी बाळाभाऊ भेगडे यांनी सांगितले.

फोटो : पोटनिवडणूक लढविण्यासाठी भाजपच्या अधिकृत उमेदवारीचे पत्र समाधान आवताडे यांना मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, आ. प्रशांत परिचारक, माजी पालक मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, भाजपचे धैर्यशील मोहिते-पाटील, श्रीकांत देशमुख, भास्कर कसगावडे.

Web Title: BJP gave an official letter to Avtade, now let's get Bhosale's understanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.