आपलं सीट गेलंय, असा भाजपच सर्वांना मॅसेज देतंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:20 AM2021-04-12T04:20:36+5:302021-04-12T04:20:36+5:30

पंढरपूर येथे प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी युवराज पाटील, सुधीर भोसले, दीपक पवार, मनसेचे दिलीप धोत्रे, माजी नगरसेवक किरण ...

BJP is giving a message to everyone that their seat is gone | आपलं सीट गेलंय, असा भाजपच सर्वांना मॅसेज देतंय

आपलं सीट गेलंय, असा भाजपच सर्वांना मॅसेज देतंय

Next

पंढरपूर येथे प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी युवराज पाटील, सुधीर भोसले, दीपक पवार, मनसेचे दिलीप धोत्रे, माजी नगरसेवक किरण घाडगे, नगरसेवक सुनील डोंबे, लखन चौगुले उपस्थित होते.

पवार म्हणाले, मला कळाले की, भारत भालके यांच्या निधनानंतर भाजपचे नेते भगीरथ भालके यांच्याकडे सांत्वन भेटीसाठी आले होते. यावेळी ते आम्ही पोटनिवडणूक बिनविरोध करायला तयार असल्याचे म्हणाले होते. परंतु राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच भाजपने उमेदवार जाहीर केला. त्यामुळे भाजपचे नेते शब्द पाळत नसल्याचे पुन्हा एकदा त्यांनीच त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे.

पंढरपुरात भीमा नदीला पूर आल्याने व कोरोनाच्या संकटाने पंढरपुरातील जनता खूप अडचणीत असताना भाजपचे उमेदवार आवताडे कोणाला मदतीसाठी पंढरपुरात आले नाहीत. त्यांनी कोणाला एक पैशांची मदत केली. अशा भयानक परिस्थित आजारी असूनदेखील स्व. आ. भारत भालके जनतेमध्ये मदतीसाठी फिरत होते. दिवंगत भालके शेवटच्या श्वासापर्यंत ३५ गावच्या पाणी प्रश्नासाठी लढले. मात्र विरोधी पक्षाचे उमेदवार कोणाला मदतीसाठी नाही तर मत विकत घेण्यासाठी पैसे काढत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली.

फोटो ::::::::::::::::::

पंढरपूर येथे भालके यांच्या प्रचार सभेदरम्यान बोलताना आ. रोहित पवार. यावेळी युवराज पाटील, सुधीर भोसले, दीपक पवार, दिलीप धोत्रे, किरण घाडगे, सुनील डोंबे, लखन चौगुले आदी.

Web Title: BJP is giving a message to everyone that their seat is gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.