भाजप सरकार शिवसेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत नाही, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 03:00 PM2018-02-08T15:00:02+5:302018-02-08T15:04:01+5:30

राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे सोलापूर दौºयावर होते़ सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त अर्पणा गीते, पोर्णिमा चौगुले, शमिष्ठा वालावलकर, गुन्हे शाखेचे सुर्यकांत पाटील यांच्यासह शहर पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़

BJP government does not keep track of Shiv Sena ministers, clarification from Minister of State for Home Ranjeet Patil | भाजप सरकार शिवसेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत नाही, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे स्पष्टीकरण

भाजप सरकार शिवसेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत नाही, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे स्पष्टीकरण

Next
ठळक मुद्देराज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे सोलापूर दौºयावर होते़ सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलापोलिसांना आठ तासांचीच ड्यूट असली पाहिजे : रणजित पाटील सोलापूरातील पोलीसांच्या घरासाठी माहिती घेतली असून, त्यासाठी पाठपुरावा करणार : रणजित पाटील


अमित सोमवंशी
सोलापूर दि ८  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजप सरकार शिवसेनेच्या मंत्र्यावर पाळत ठेवत असल्याचे बोलले जात आहे़ मात्र राज्य सरकारच्या यंत्रणेकडून शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यावर पाळत ठेवली जात नाही. हा आरोप चुकीचा आहे, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज येथे स्पष्ट केले.
राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे सोलापूर दौºयावर होते़ सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त अर्पणा गीते, पोर्णिमा चौगुले, शमिष्ठा वालावलकर, गुन्हे शाखेचे सुर्यकांत पाटील यांच्यासह शहर पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ सरकारतर्फे विरोधी पक्षाचे नेते आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत असल्याचा आरोपही हल्ली केला जात आहे. यासंदर्भात विचारले असता त्यांनी वरील स्पष्टता केली.     
पुढे बोलताना रणजित पाटील म्हणाले की, पोलिसांना आठ तासांचीच ड्यूट असली पाहिजे, असे मत व्यक्त करतानाच प्रायोगिक तत्वावर मुंबई येथे पोलिसांची आठ तास ड्युटी करण्यात आली आहे, राज्यातही अशाच पध्दतीची आठ तासाची ड्यूटी करण्याचा सरकारचा मानस आहे़ हे सरकार पोलिसांच्या घरासाठी विविध योजना राबवत आहे.  सोलापूरातील पोलीसांच्या घरासाठी माहिती घेतली असून, त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  मागील डिसेंबर महिन्यात प्रत्येक जिल्ह्याला फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) लॅब दिलेली आहे. अपराध सिध्दतेसाठी पुरावा गरजेचा असतो, म्हणुन प्रत्येक जिल्हा ठिकाणी आणि पोलीस कमीशनरला मोबाईल लॅब दिलेली आहे. रक्ताचे नमुने, केसाचे नमुने व फिगर प्रिट इत्यादी अनेक बाबीसाठी थेट जागेवर जाऊन तंत्रकुशल व्यक्तीकडून घेण्यात येत आहे. सर्व पोलीस ठाणे ‘सीसीएनएस’ ने जोडत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोलापूर शहरासाठी आणखी  चार पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव आहे. येत्या काळात बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-------------------
‘सीसीटीव्ही’ चे जाळे उभे करणार
पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामात सुसुत्रता आण्यांसाठी शासन प्रयत्न करत आहे. सर्व पोलीस ठाणे ‘सीसीटीव्ह’ चेजाळे निर्माण करणार आहे.य् ाामुळे पोलिसांच्या कामात गती येऊन कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही. याबात योग्य नियोजन करण्यात यश येईल. यासाठी लोकांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे.आगामी काळात पोलीस तपास यंत्रणा आणि बंदोबस्त यंत्रणा वेगळी असा  प्रस्ताव  आहे त्यावर निर्णय होयचा असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: BJP government does not keep track of Shiv Sena ministers, clarification from Minister of State for Home Ranjeet Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.