सत्ता टिकविण्यासाठी भाजप सरकार पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याच्या तयारीत : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:07 PM2018-07-05T12:07:07+5:302018-07-05T12:08:46+5:30

प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या पेरून केले जातेय नियोजन

BJP government is ready to fight with Pakistan: Prakash Ambedkar | सत्ता टिकविण्यासाठी भाजप सरकार पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याच्या तयारीत : प्रकाश आंबेडकर

सत्ता टिकविण्यासाठी भाजप सरकार पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याच्या तयारीत : प्रकाश आंबेडकर

googlenewsNext
ठळक मुद्देधुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील घटना अत्यंत दुर्दैवी - आंबेडकरदेशात पुन्हा मनुवाद लागू केला जात आहे - आंबेडकरसंविधान धोक्यात आहे, त्याला वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज - आंबेडकर

सोलापूर : अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर मिळविलेली सत्ता भविष्यात टिकविण्यासाठी विद्यमान भाजप सरकार पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याच्या तयारीत आहे. सीमेवर सैनिक लढणार आणि देशात सत्ता मिळविण्यासाठी भाजप लढणार आहे. प्रसारमाध्यमांमध्ये तशा बातम्या पेरण्याचे काम सध्या सुरू आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी सोलापूर दौºयावर आले असता शासकीय विश्रामगृहात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे़ मंगळवेढा येथील त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलो असता त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मदत जाहीर करून शासनाने आपली जबाबदारी झटकली आहे. वास्तविक पाहता अशा खोट्या अफवा पसरवून हे वातावरण कोण निर्माण करीत आहे, याचा शोध शासनाने घेतला पाहिजे. या सर्व प्रकारामागे एक यंत्रणा आहे़ सायबर क्राइमने याबाबत जागरुक राहून अफवा पसरविणाºयांना अटक करावी. पोटासाठी भटकंती करणाºया या समाजाचे पुनर्वसन करावे. त्यांना जमिनी देऊन भटकंती थांबवावी, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. 

दर तीन महिन्यांतून अशा पद्धतीची दहशत सध्या राज्यात आणि देशात पसरविली जात आहे. देशात पुन्हा मनुवाद लागू केला जात आहे. मनुवादाला संपविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. सामाजिक सलोखा आणि सर्वजण एकत्र येणे याचा सामाजिक आशय असला तरी राजकीय सत्ता हस्तगत करणे हा मूळ उद्देश आहे.

गेल्या ७0 वर्षांत एकही अतिमागास ओबीसी समाजातील व्यक्ती लोकसभेत गेली नाही. राजकीय पक्षांनी उमेदवारी दिली नाही. एस.सी., एस.टी.ला राखीव जागा असल्याने नाईलाजास्तव त्यांना उमेदवारी दिली जाते. आम्ही ठरविले आणि स्वतंत्र वाटचाल सुरू केली. संविधान धोक्यात आहे, त्याला वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आगामी निवडणुकीत धनगर, माळी, मुस्लीम आणि अन्य समाजाला मान्य करीत असाल तरच आम्ही धर्मनिरपेक्षवाद्यांसोबत जाण्यास तयार आहोत. 

काँग्रेस पक्षात दुर्दैवाने घराणेशाही निर्माण झाली आहे. त्यांनी सत्तेत राहावे हरकत नाही, मात्र त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करावे. लोकशाहीचे सामाजिकरण करावे तरच लोकशाही यशस्वी होईल, असेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी माजी आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार विजयराव मोरे, अर्जुन सलगर, उत्तम नवघरे आदी उपस्थित होते. 

दहशत पसरविणे सत्ताधाºयांचा बेस...
- माझ्या हातून दंगल घडू नये म्हणून आज मुस्लीम समाज पोलीस स्टेशनमध्ये जात नाही म्हटल्यावर देशात आरक्षणाचा मुद्दा पुढे करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आरक्षणाचा मुद्दा मांडूनही काही होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अन्य मार्गाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दहशत पसरविणे हा सत्ताधाºयांचा मूळ बेस आहे. प्रत्येक घटनेनंतर पंतप्रधानांची मुलाखत केविलवाण्या सरपंचासारखी असते. ही स्थिती बदलायची असेल तर २0१९ च्या निवडणुकीत सर्व जाती-धर्मांनी एकत्र आले पाहिजे, असेही यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

Web Title: BJP government is ready to fight with Pakistan: Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.