दक्षिणमध्ये काँग्रेस नेत्यांच्या गावात भाजपाची मुसंडी
By admin | Published: May 23, 2014 01:16 AM2014-05-23T01:16:39+5:302014-05-23T01:16:39+5:30
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गावात भाजपाने चांगलीच मुसंडी मारली आहे़
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गावात भाजपाने चांगलीच मुसंडी मारली आहे़ लोकसभा निवडणुकीने अनेक नेत्यांची बोलतीच बंद केली आहे़ स्वत:ची गावे राखता न आल्याने आता या नेत्यांसमोर पंचाईत निर्माण झाली आहे़ अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दक्षिणमधील गावांमध्ये भाजपाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले आहे़ मुळेगाव तांडा येथे जि़ प़ सदस्य उमाकांत राठोड यांनी काँग्रेसला ११८७ मताधिक्य दिल्याने त्यांची गावावरील पकड मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ मात्र त्यांच्या बोरामणीमध्ये काँग्रेसची पीछेहाट झाली आहे़ माजी मंत्री आनंदराव देवकते, आमदार दिलीप माने, जि़प़ सदस्य सुरेश हसापुरे, सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे, उपसभापती आप्पा धनके, माजी सभापती भीमाशंकर जमादार, तालुकाध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली असली तरी काँग्रेसला स्वत:च्या गावात मताधिक्य मिळवून देण्यात ते कमी पडले आहेत़ उमाकांत राठोड यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, सभापती इंदुमती अलगोंडा यांनी मात्र आपली गावे राखली आहेत़
---------------------
प्रकल्पग्रस्तांची पाठ एनटीपीसी प्रकल्प साकारत असलेल्या आहेरवाडी, होटगी स्टेशन येथे स्थानिकांनी काँग्रेसला नाकारले आहे़ पॉवरग्रीड(लिंबीचिंचोळी), बीएसएफ(टाकळी) प्रकल्पाच्या गावातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही़