महाआघाडी नेते म्हणाले, असेच एकत्र राहिलो तर महापालिकेतूनही भाजप हद्दपार होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 12:03 PM2020-12-07T12:03:57+5:302020-12-07T12:05:52+5:30

पदवीधरचे पडसाद : आम्हाला फरक पडत नाही, देशमुखांचे प्रत्युत्तर

The BJP leaders said that if we stay together like this, BJP will also be expelled from the Municipal Corporation | महाआघाडी नेते म्हणाले, असेच एकत्र राहिलो तर महापालिकेतूनही भाजप हद्दपार होईल

महाआघाडी नेते म्हणाले, असेच एकत्र राहिलो तर महापालिकेतूनही भाजप हद्दपार होईल

Next
ठळक मुद्देसोलापूर शहराच्या राजकारणावर आता भाजपचा वरचष्मा महापालिकेत सत्ता असून, एक खासदार, दोन आमदारही आहेतसोलापुरातून भाजपचे पदवीधरचे उमेदवार संग्राम देशमुख यांना मताधिक्य मिळेल

सोलापूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीचे नेते शहर भाजपवरही डोळे वटारू लागले आहेत. आम्ही असेच राहिलो तर भाजप महापालिकेतूनही हद्दपार होईल, अशा प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

सोलापूर शहराच्या राजकारणावर आता भाजपचा वरचष्मा आहे. महापालिकेत सत्ता असून, एक खासदार, दोन आमदारही आहेत. त्यामुळे सोलापुरातून भाजपचे पदवीधरचे उमेदवार संग्राम देशमुख यांना मताधिक्य मिळेल असा नेत्यांचा अंदाज होता. हा अंदाज फोल ठरल्याचे मतपेटी दाखवते. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे यांनी तीन पक्षांतील नेत्यांना एकत्र ठेवले. शिंदे यांनी आगामी मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सामाजिक समीकरणे जुळवायला सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले, शिवसेना सध्या १०२ वॉर्डात संघटनात्मक बांधणी करीत आहे, पण महापालिका निवडणूक महाआघाडीने एकत्र लढावी हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यात तिघांनीही जागा वाटपाचा हट्ट सोडायला हवा. शहरातील शिक्षित माणसे भाजपवर नाराज असल्याचे आम्हाला प्रचारादरम्यान दिसले. एकत्र लढलो तर भाजप महापालिकेतून हद्दपार होईल.

लोक भाजपच्या महापालिकेतील कारभारावर नाराज आहेत. कुणाचा कुणाला मेळ नसल्याने शहराची वाट लागण्याची वेळ आली. राष्ट्रवादी सर्वच वॉर्डात मोर्चेबांधणी करीत आहे. महाविकास आघाडी एकत्र लढली तर भाजपचा सफाया होईल. पदवीधरसारखाच निकाल असेल.

- संतोष पवार, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी

महाविकास आघाडीत एकत्र असलेले लोक उद्या ते एखाद्या कारणामुळे वेगळेही होऊ शकतात. पदवीधर मतदारसंघात तिघांनी एकत्र येऊन मिळवलेली मते आणि भाजपची एकट्याची मते पाहिली तर महाआघाडीचा भ्रम तुटेल. मनपा निवडणुकीतील समीकरणे उमेदवाराच्या व्यक्तिगत संपर्कावर अवलंबून असतात. महाआघाडी एकत्र लढली तरी भाजपला फरक पडणार नाही.

- विक्रम देशमुख, शहराध्यक्ष, भाजप

महाआघाडीचा निर्णय वरिष्ठच घेतील. महापालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे आम्ही सर्वच वॉर्डात तयारी करतोय, पण ही आघाडी कायम राहावी अशी आमची तरी इच्छा आहे. वरिष्ठ जे सांगतील तेच आम्ही करणार.

- चेतन नरोटे, गटनेता, काँग्रेस

Web Title: The BJP leaders said that if we stay together like this, BJP will also be expelled from the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.