विषय समिती सभापती निवडणुकीसाठी सोलापूर महापालिकेत भाजप-शिवसेना एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 02:30 PM2018-05-16T14:30:30+5:302018-05-16T14:30:30+5:30

सोलापूर महापालिकेतील सात विषय समिती सभापतीच्या निवडणुका बिनविरोध

BJP-Shiv Sena together in Solapur municipal corporation elections | विषय समिती सभापती निवडणुकीसाठी सोलापूर महापालिकेत भाजप-शिवसेना एकत्र

विषय समिती सभापती निवडणुकीसाठी सोलापूर महापालिकेत भाजप-शिवसेना एकत्र

Next
ठळक मुद्देमनपाच्या सात विषय समिती सभापती निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज भरण्यात आले़अधिकृत घोषणा पीठासन अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड हे १७ मे रोजी करतील़

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत विरोधी पक्ष म्हणून कार्यरत असलेल्या शिवसेनेने विरोधकांना अंधारात ठेवून भाजपशी हातमिळवणी करून तीन जागा पदरात पाडून घेत विषय समिती निवडणुक बिनविरोध करण्यात यश मिळविले़ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपाने निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने या जागा बिनविरोध झाल्या असून याची अधिकृत घोषणा पीठासन अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड हे १७ मे रोजी करतील़

मनपाच्या सात विषय समिती सभापती निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज भरण्यात आले़ स्थापत्य समितीसाठी गुरूशांत धुत्तरगांवकर (शिवसेना), शहर सुधारणा समितीसाठी शालन शिंदे (भाजप), वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीसाठी वरलक्ष्मी पुरूड, उद्यान, (भाजप), मंड्या समितीसाठी कुमूद अंकाराम (शिवसेना), विधी समितीसाठी विनायक कोंड्याल, कामगार व समाजकल्याण समितीसाठी रवी कैय्यावाले (भाजप), आणि महिला बालकल्याणसाठी रामेश्वरी बिर्रू (भाजप) यांचे एकमेव अर्ज दाखल झाले आहेत़

विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी सभागृहनेते संजय कोळी यांच्याशी चर्चा करून एक होऊन काही समित्या पदरात पाडून घेतल्यात़ गतवर्षीप्रमाणे सर्व विरोधक एक होऊन काही समित्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, राष्ट्रवादीचे किसन जाधव, बसपाचे आनंद चंदनशिवे यांनी केला़ त्यांच्या प्रयत्नाला एमआयएमचे तौफिक शेख यांनी प्रतिसाद दिला नाही तर विरोधी पक्षनेते कोठे यांनी सकाळी पाहु म्हणून वेळ मारून नेली़ बुधवारी सकाळी कोठे भाजपसोबत आहेत हे कळल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी व बसपाने निवडणुकीवर बहिष्कार घातला़ 

विकासासाठी एकत्र.......
विषय समितीचे तसे काही काम नसतेच़ महिला बाल कल्याण, मंड्या, स्थापत्य समिती वगळता इतर समित्याच्या बैठका होत नाहीत़ त्यामुळे श्हराच्या विकासाबद्दल चर्चा व्हावी म्हणून या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला असे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी सांगितले़

उमेदवारी अर्ज करण्याच्यावेळेस भाजपमधील गटबाजीची चर्चा झाली़ सहकारमंत्री गटाच्या संगिता जाधव या महिला बालकल्याण सभापतीसाठी इच्छुक होत्या़ पण पालकमंत्री गटाने त्यावर मात करीत ऐनवेळी रामेश्वरी बिर्रू यांचे नाव पुढे करीत पद्मशाली समाजाला न्याय देत असल्याचे स्पष्ट केले़ यामुळे आरोग्य समितीसाठी नाव घेतलेले सहकारमंत्री गटाचे संतोष भोसले यांनी उमेदवारी अर्ज करण्यावर बहिष्कार टाकला़ त्यामुळे ऐनवेळी शालन शिंदे यांना उमेदवारी दिल्याचे सभागृहनेते संजयकोळीयांनीसांगितले़

Web Title: BJP-Shiv Sena together in Solapur municipal corporation elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.