भाजपकडून माढ्यात सर्व शासकीय ताकद खर्ची : संजय शिंदेंची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:03 PM2019-04-02T12:03:41+5:302019-04-02T12:08:03+5:30
भाजपचे नेते आता संजयमामांना बघून घेतो, त्यांची चौकशी करतो, अशा पोकळ धमक्या देत आहेत. अशा पोकळ धमक्यांना घाबरणाºयांपैकी मी नाही : संजय शिंदे
सांगोला : भाजपचे नेते माढा लोकसभा मतदारसंघासाठी सर्व शासकीय ताकद खर्ची टाकायला लागले का? असे मला वाटायला लागले असल्याची टीका संजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीतील नेतेमंडळीचे आपले जमत नसल्यामुळे काहीकाळ पक्षापासून दुरावलो होतो; मात्र मी दुसºया कोणत्याच राजकीय पक्षात प्रवेश केला नव्हता. राष्ट्रवादीच्या विचाराचा मी एक कार्यकर्ता असून भाजपच्या दबावतंत्राला जुमानणाºयांपैकी मी नाही. त्यामुळे भाजपचे नेते आता संजयमामांना बघून घेतो, त्यांची चौकशी करतो, अशा पोकळ धमक्या देत आहेत. अशा पोकळ धमक्यांना घाबरणाºयांपैकी मी नसल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले.
संजय शिंदे म्हणाले, आतापर्यंत भाजपने प्रवेश करणाºयांपैकी ८ ते १० जणांना राज्यसभा, काहींना विधानपरिषद, राज्यपाल व राज्यमंत्री पदाचे वाटप केले आहे. आज माझ्यासोबतची जी मंडळी भाजपमध्ये गेली आहे ती मनाने गेली नाही तर सत्तेच्या दबावापोटी त्यांच्यासोबत गेली आहेत.
भाजपने मला उमेदवारी घ्या अन्यथा निवडणूक लढवू नका, असा दबाव टाकला होता, परंतु एकदा घेतलेल्या निर्णयावर मी ठाम असतो. खरेतर मी लोकसभेला इच्छुक नव्हतो त्यावेळेला भाजपने तुम्ही उमेदवार होणार नसेल तर आम्ही मोहिते-पाटील यांचा प्रवेश करून त्यांना उमेदवारी देतो असा अल्टीमेट देऊन निर्णय कळविण्याचे सांगितले होते, परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो. माझ्यावर राष्ट्रवादीच्या विचाराचा पगडा असल्याने मी पक्षाचा उमेदवार झालो आहे. सरकार सत्तेच्या जीवावर, जनशक्तीच्या जोरावर काहीही करु लागले आहे, परंतु ते लोकसत्तेपुढे टिकणार नाही. आतापर्यंत अनेकजणांनी बघून घेतो म्हणाल्यामुळेच मी मोठा झाल्याचे त्यांनी सांगितले.
राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे म्हणाले, आधी तुम्ही जनतेतून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवा मगच शरद पवार यांच्याविषयी बोला, असा थेट इशारा देऊन ज्यांना ग्रामपंचायतीची निवडणूक लढवता आली नाही ते शरद पवार यांच्यावर टीका करतात. त्यांनी अगोदर निवडणूक लढवावी मगच पवार यांच्याविषयी बोलावे अशी उपरोक्त टीका चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर त्यांनी केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, नाथा जाधव, चंद्रकांत चौगुले उपस्थित होते.