भाजपच्या चिंतन बैठकीत निरीक्षक महाडिकांवर कार्यकर्ते झाले नाराज; एकत्रित बैठक घेण्याची केली मागणी

By बाळकृष्ण दोड्डी | Published: June 22, 2024 02:42 PM2024-06-22T14:42:53+5:302024-06-22T14:45:26+5:30

युवकांची मागणी फेटाळल्याने निरीक्षक खा. धनंजय महाडिक यांच्यावर कार्यकर्ते नाराज झाले. काहीसा गोंधळ करण्याचा प्रयत्न युवकांनी केला. परंतु इतर पदाधिकाऱ्यांनी शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर बैठक पूर्ववत सुरु झाली.

BJP workers in Solapur expressed their displeasure | भाजपच्या चिंतन बैठकीत निरीक्षक महाडिकांवर कार्यकर्ते झाले नाराज; एकत्रित बैठक घेण्याची केली मागणी

भाजपच्या चिंतन बैठकीत निरीक्षक महाडिकांवर कार्यकर्ते झाले नाराज; एकत्रित बैठक घेण्याची केली मागणी

सोलापूर : विधानसभानिहाय नको, संपूर्ण लोकसभा मतदारसंघाची एकच सार्वजनिक बैठक घ्या. पराभवाची कारणे आम्हालाही कळू द्या, अशी मागणी भाजपच्या चिंतन बैठकीत अक्कलकोट व मोहोळ तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांनी केली.

युवकांची मागणी फेटाळल्याने निरीक्षक खा. धनंजय महाडिक यांच्यावर कार्यकर्ते नाराज झाले. काहीसा गोंधळ करण्याचा प्रयत्न युवकांनी केला. परंतु इतर पदाधिकाऱ्यांनी शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर बैठक पूर्ववत सुरु झाली.

सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. पराभवची कारणे शोधण्यासाठी भाजपची चिंतन बैठक सुरू आहे. शांतीसागर मंगल कार्यालयात निरीक्षक महाडिक यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरू आहे. कार्यकर्त्यांना शांत करत महाडिक यावेळी म्हणाले, विधानसभानिहाय  चर्चा करा...रात्री बारापर्यंत मी थांबेन. अद्याप बैठक सुरू असून विधानसभानिहाय चिंतन सुरू आहे.

Web Title: BJP workers in Solapur expressed their displeasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.