पीकविमा योजनेत भाजपकडून शेतकºयांची फसवणूक : एम. बी. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:00 AM2019-04-16T11:00:35+5:302019-04-16T11:03:24+5:30
सोलापूर लोकसभा काँग्रेस आघाडीचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ पाटील सोलापूर दौºयावर आले होते.
सोलापूर : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत शेतकºयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप कर्नाटकचे गृहमंत्री एम. बी. पाटील यांनी येथे बोलताना केला.
सोलापूर लोकसभा काँग्रेस आघाडीचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ पाटील सोलापूर दौºयावर आले होते. सायंकाळी काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली. मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजना काढली. या योजनेसाठी देशातील अनेक शेतकºयांनी पैसे भरले.
महाराष्ट्र व कर्नाटकात चालू वर्षी भीषण दुष्काळ पडला. शेतकºयांच्या हातून पिके गेली, पण प्रधानमंत्री पीकविमा योजनेतून पाच टक्के शेतकºयांनाही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे या योजनेत मोठा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला.
मोदी सरकारने शेतकºयांना पीकविमा योजनेत फसविले. बड्या उद्योगपतींना कर्जमाफी दिली, पण दुष्काळाने होरपळून गेलेल्या शेतकºयांची त्यांना दया आली नाही. नागरिकांच्या खात्यावर १५ लाख देतो म्हणाले होते. त्यासाठी नोटाबंदी केली. यातून काळा पैसा बाहेर काढतो म्हणाले होते. पण नोटाबंदीतून सामान्य लोक, व्यापारी हैराण झाले. काळा पैसा बाहेर आलाच नाही. अनेक पातळ्यांवर हे सरकार अपयशी झाले, असे पाटील यांनी सांगितले.
यावेळी माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, राजशेखर शिवदारे, जाफरताज पटेल, भीमाशंकर जमादार उपस्थित होते.