एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात भाजपाची उडी; कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना भाजपचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2021 09:15 PM2021-11-04T21:15:51+5:302021-11-04T21:16:08+5:30
सोलापूर लोकमत नेटवर्क
मंगळवेढा : संपूर्ण महाराष्ट्र घरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरण झाले पाहिजे हे महत्त्वाची मागणी घेऊन हा संप सुरू आहे . मंगळवेढा बसस्थानकामध्ये देखील आज कर्मचाऱ्यांच्या या संपाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण पाठिंबा देऊन या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला.
सध्या महाराष्ट्रभर मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या 33 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्य कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे उभा राहणार प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे म्हणत, भाजपने महाराष्ट्र मध्ये या संपाला पाठिंबा दिला आहे . मंगळवेढा येथे आमदार समाधान आवताडे यांनी आंदोलनास बसलेल्या कर्मचाऱ्यांना उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांची सर्व मागणी रास्त असून त्यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे. कोणावरही कारवाई चे दमदाटी करत असेल तर त्यांना असा करण्याचा अधिकार नाही, तसे कोणाबाबत होत असेल तर तसे होऊ देणार नाही असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी यावेळी भेट घेतली व आगार प्रमुखांना या संपाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांनी प्रामुख्याने धरणे आंदोलनाला बसत कोणत्याही दबावाला बळी न पडता कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप सुरू राहील व त्याला भाजपचा पाठिंबा असेल असे मत व्यक्त केले. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सोमनाथ अवताडे यांनी देखील या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन यादव यांनी राज्य सरकारवर टीका केली व या कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याकरिता या लढ्यासोबत असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाढदेकर, तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, दामाजी शुगर संचालक लक्ष्मण जगताप, सहकार विभाग संयोजक सत्यजित सुरवसे, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष नागेश डोंगरे, शहराध्यक्ष सुशांत हजारे , शहर सरचिटणीस अजित लेंडवे, शहर उपाध्यक्ष सुजित निकम, ज्ञानेश्वर काशीद, रोहित हिरेमठ, किसान मोर्चा सरचिटणीस विजय बुरकुल, जेष्ठ नेते अशोक माळी, सुरेश जोशी तसेच एसटी कर्मचारी उपस्थित होते.