लाेकसभा तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे मध्यप्रदेशचे मंत्री रविवारी साेलापुरात
By राकेश कदम | Updated: February 22, 2024 18:33 IST2024-02-22T18:33:24+5:302024-02-22T18:33:34+5:30
बूथ यंत्रणेचा आढावा घेणार : माढा मतदारसंघाचे कार्यकर्तेही येणार

लाेकसभा तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे मध्यप्रदेशचे मंत्री रविवारी साेलापुरात
साेलापूर : लाेकसभा निवडणुकीच्या तयारीचा घेण्यासाठी भाजपचे तीन लाेकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख तथा मध्यप्रदेशचे मंत्री प्रल्हाद पटेल २४ ते २६ फेब्रुवारी राेजी माढा आणि साेलापूर लाेकसभा मतदारसंघाच्या दाैऱ्यावर येत आहेत. या दाेन्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांची एकत्र बैठक रविवारी साेलापुरात हाेईल, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली.
नरेंद्र काळे म्हणाले, भाजपने बूथ यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी क्लस्टर तयार केले आहेत. लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कामाच्या तयारीची अखेरची बैठक आता हाेईल. साेलापूर आणि माढा मतदारसंघातील बूथ यंत्रणा पूर्णपणे तयार आहे. मंत्री प्रल्हाद पटेल शनिवारी सायंकाळी साेलापुरात येतील. साेलापूर, अक्कलकाेट, पंढरपूर, माढा या भागातील दाैरे झाल्यानंतर रविवारी ते साेलापुरात येतील.
शहरातील एका मंगल कार्यालयात आढावा बैठक हाेईल. खासदार डाॅ. जयसिध्देश्वर, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह भाजपचे आमदार या बैठकीला येणार आहेत. भाजपचा लाेकसभेचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. उमेदवारीसंदर्भात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक हाेण्याची शक्यता आहे, असेही काळे यांनी सांगितले.