राईनपाडाच्या दु:खावर पूजाच्या अक्षतांची फुंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:18 PM2018-10-29T12:18:11+5:302018-10-29T12:24:42+5:30
खवे: वडिलांच्या खुनानंतर अवघ्या तीन महिन्यांत लग्न
मंगळवेढा : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाथपंथी गोसावी डवरी समाजाच्या पाच जणांची हत्या झाल्यानंतर भेदरलेल्या आणि दु:खाच्या छायेत वावरणाºया समाजातील लोकांच्या भावनांवर फुंकर घालण्यात रविवारी यश आले. निमित्त होते या हत्याकांडात मरण पावलेल्या भारत भोसले यांची मुलगी पूजा हिच्या लग्नाचे. या लग्नाची संपूर्ण जबाबदारी जमियत उलमा-ए-हिंद संस्थेने घेतली होती.
मुले पळविणारी टोळी म्हणून राईनपाडा येथे मंगळवेढा तालुक्यातील खवे आणि मानेवाडी येथील पाच जणांची हत्या करण्यात आली होती. जमियतने या गावी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन करताना मुलींच्या लग्नाची आणि शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे जाहीर केले होते.
भारत भोसले यांची मुलगी पूजा हिचा विवाह खवे गावातील जालिंदर नागू चौगुले याच्याशी ठरला होता. जमियतचे प्रदेशाध्यक्ष मौलाना नदीम सिद्धीकी, मौलाना इब्राहीम कासमी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर जमियतच्या पदाधिकाºयांनी लग्नासाठी लागणारे सर्व संसारोपयोगी साहित्य व जेवणाची सोय केली.
रविवारी झालेल्या या साध्या पद्धतीच्या लग्नसोहळ्यास जमियत उलमा-ए-हिंदचे जिल्हाध्यक्ष मौलाना इब्राहीम कासमी, हाजी कय्युम जमादार, हसीब नदाफ, युनूस डोणगांवकर, हाफिज अ.हमीद चांदा, म.रफिक इनामदार, मंगळवेढ्याचे हाफिज रियाज ,हाजी सलीम बागवान, सचिव रमीजराजा मुल्ला, तसलीम आकुंजी उपस्थित होते.
आम्ही केलेली मदत उपकार नसून इस्लामने सांगितलेल्या मानव कल्याणाची जबाबदारी पार पाडल्याचे मौलाना इब्राहीम कासमी यांनी सांगत नववधू-वरांना शुभेच्छा दिल्या. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी जमियतच्या कार्याचे कौतुक करताना पोलीस प्रशासनाकडून अभिनंदन केले. दादाराव भोसले यांनी या लग्नसोहळ्यातून हिंदू-मुस्लीम ऐक्याची जाणीव झाल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी भटके-विमुक्त संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मच्छिंद्र भोसले, अखिल भारतीय नाथपंथी डवरी समाजाचे प्रदेश अध्यक्ष प्रा.गौरव इंगोले, महादेव इंगोले,नामदेव इंगोले यांनी जमियतबद्दल गौरवोद्गार काढले.
या विवाह सोहळ्यास खवे गावचे सरपंच विकास दुधाळे, मंडल अधिकारी वाकसे,लक्ष्मण इंगोले,नागनाथ इंगोले, गावकरी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
अन् हंबरड्याने मांडव हेलावला
- आजच्या लग्नसोहळ्यावर मयत भारत भोसले यांच्या मृत्यूची छाया पसरली होती. मुलीच्या लग्नावेळी पती नसल्याने आईने हंबरडा फोडला. यामुळे सारा मांडव, वºहाडी हेलावून गेले. मुलीच्या चेहºयावरही वडील नसल्याने आनंद नव्हता. ती कमतरता सातत्याने तिच्या चेहºयावर जाणवत होती. या लग्नसोहळ्यात राईनपाडा हत्याकांडात मरण पावलेल्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.