मोहोळमध्ये भाजपचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:23 AM2021-03-23T04:23:45+5:302021-03-23T04:23:45+5:30
मोहोळ : राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून राज्यात वीजबिलांची सक्तीची वसुली केली जात आहे. शेतक-यांच्या विजेचे ट्रान्सफाॅर्मर ...
मोहोळ : राज्य विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून राज्यात वीजबिलांची सक्तीची वसुली केली जात आहे. शेतक-यांच्या विजेचे ट्रान्सफाॅर्मर सोडविले जात आहेत. घरगुती वीज तोडली जात आहे. या विरोधात मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोहोळ येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदिरा कन्या प्रशाला चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी मोहोळ विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पोलीस अधिकारी अशोक सायकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
कोरोनाकाळात शेतकरी अडचणीत असताना राज्य शासन वीज महावितरण कंपनीमार्फत सक्तीने वीजबिलांची वसुली करत आहे. याविरोधात मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवारी दुपारी १२ वाजता राष्ट्रीय महामार्गावर महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलनकर्त्यांनी घोषणा दिल्या.
महाविकास आघाडी सरकार कोरोना महामारी व अतिवृष्टीमुळे अडचणीत असलेल्या शेतक-यांना आणखी संकटात टाकण्याचे काम करत आहे. विजेचे कनेक्शन, ट्रान्सफाॅर्मर सोडविले जात आहेत. अशा शेतकरीविरोधी सरकारला खाली खेचा, असे आवाहन मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे संजय क्षीरसागर यांनी केले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, सरचिटणीस सतीश पाटील, फंटू गोफणे, पांडुरंग बचुटे, बाळासाहेब पवार, लिंगदेव निकम, मुजीब मुजावर, सुनील पाटील, श्रीकांत शिवपुजे, शहाजी देशमुख, महावीर पुजारी, महेश धुमाळ, भारत आवारे, औदुंबर वाघमोडे, बाबासाहेब जाधव, श्रीकांत लांडगे, मोहोन होनमाने, बाळासाहेब पाटील, अंबादास भोसले, सागर लेंगरे, दीपक गवळी, विशाल पवार, जगन्नाथ वसेकर, दिगंबर वसेकर, युवराज ढेरे, रमेश भानवसे, प्रदीप आमले, शशिकांत गावडे, विष्णुपंत चव्हाण, विवेक पाटील, स्वप्नील डोंगरे, बालाजी चव्हाण, दिनेश गडदे, प्रशांत गाढवे, गुरुराज तागडे, जालिंदर खंदारे.
सतीश पाटील उपस्थित होते.
---
२२ मोहोळ स्ट्राईक
मोहोळ येथे विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांना निवेदन देताना भाजपाचे पदाधिकारी.