भर पावसात मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ सोलापूर-बार्शी महामार्गावर रास्ता रोको
By Appasaheb.patil | Published: June 11, 2024 04:56 PM2024-06-11T16:56:10+5:302024-06-11T17:03:34+5:30
लवकरात लवकर मराठा समाजासाठी सगेसोयरे कायदा लागू करण्यात यावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: मराठा समाजाला आरक्षण द्यावे, सगेसोयरे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर-बार्शी महामार्गावर वैराग (ता. बार्शी) येथील छत्रपती शिवाजी चौकात भर पावसात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. आंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दररोज वेगवेगळ्या गावात आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला.
या आंदोलनावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीची गांभीर्याने सरकाराने दखल घेऊन लवकरात लवकर मराठा समाजासाठी सगेसोयरे कायदा लागू करण्यात यावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक तानाजी पवार, मंडळ अधिकारी विरेश कडगंजी यांनी आंदोलन कर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी तलाठी महेश जाधव, गोपनीय शाखेचे किसन कोलते यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.