भुयारी रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:16 AM2021-07-16T04:16:28+5:302021-07-16T04:16:28+5:30

नारायण चिंचोलीत पुरातन हेमाडपंती सूर्यनारायण मंदिर हे राज्यातील एकमेव देवस्थान आहे. राज्यभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. सध्या मोहोळ- ...

Block the villagers' way to demand the subway | भुयारी रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

भुयारी रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

Next

नारायण चिंचोलीत पुरातन हेमाडपंती सूर्यनारायण मंदिर हे राज्यातील एकमेव देवस्थान आहे. राज्यभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. सध्या मोहोळ- पंढरपूर- आळंदी या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामात पंढरपूरपासून अवघ्या १० कि.मी. अंतरावर असलेल्या नारायण चिंचोलीवर अन्याय होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाव आणि शेती विभागली आहे. त्यामुळे येथे पोहोच व भुयारी रस्ता करणे गरजेचे आहे. २५ जुलैपर्यंत याबाबत आदेश न निघाल्यास जोपर्यंत पोहोच भुयारी रस्ता होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ हा रस्ता रोखून धरतील, असे भाजप अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे यांनी सांगितले.

या मागणीचे लेखी निवेदन तुंगत मंडलचे मंडल अधिकारी आर.एस. मोरे यांना दिले. यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव माउली हळणवर, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष संतोष चव्हाण, रासपाचे जिल्हाध्यक्ष पंकज देवकते, सरपंच, उपसरपंच, सूर्यनारायण देव ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पीएसआय वसमळे, तुंगत बीटचे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Block the villagers' way to demand the subway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.