कर्नाटकच्या सीमेवर नाकाबंदी, आठ पथकांद्वारे वाहनांची तपासणी
By काशिनाथ वाघमारे | Published: March 17, 2024 06:03 PM2024-03-17T18:03:18+5:302024-03-17T18:03:48+5:30
लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर दिवसा चार तर रात्री चार पथक कार्यरत असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी निवडणूक व पोलिस कर्मचारी असे तीन कर्मचारी त्या पथकात असतील.
सोलापूर: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यात कर्नाटक -महाराष्ट्र सीमेवर आठ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. ही पथकं रविवारी रात्रीपासून कार्यरत झाली आहेत. यामध्ये निवडणूक कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांचा सहभाग आहे.
लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर दिवसा चार तर रात्री चार पथक कार्यरत असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी निवडणूक व पोलिस कर्मचारी असे तीन कर्मचारी त्या पथकात असतील. या पथकाकडून वाहने तपासली जात आहेत. मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, शस्त्र आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल केला जात आहे.
शनिवारी सहायक निवडणूक अधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार विनायक मगर, अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे, दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश स्वामी यांनी पथकं नेमली आहेत.
स्थिर पथकं, व भरारी पथकं असणार आहेत. कर्नाटकची सीमा ही अक्कलकोट तालुक्याला लागून असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. याबरोबरच तहसील कार्यालयाकडून सभेच्या ठिकाणी व्हिडीओ कॅमेरे लावले जाणार आहेत. त्यासाठी चार पथक नेमली आहेत. दोन तपासणी पथक असणार आहेत. खर्च, नियंत्रण टीम, नियंत्रण कक्ष असणार आहे. आचार संहिता कक्ष सुद्धा असणार आहेत.
या ठिकाणी आहे नाकाबंदी
नाकाबंदी पथक तडवळ, दुधनी, हिळळी-मणूर, हैद्रा, तोळणूर-माशाळ रोड, वागदरी-हिरोळी, सलगर-निंगदळी अशा आठ ठिकाणी ही नथके नेमली आहेत. प्रत्येक नाकाबंदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत.