शहराला जोडणाऱ्या सात रस्त्यांवर नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:17 AM2021-04-29T04:17:19+5:302021-04-29T04:17:19+5:30

सांगोला शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. प्रशासनाकडून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करून १ मेपर्यंत ...

Blockade on seven roads connecting the city | शहराला जोडणाऱ्या सात रस्त्यांवर नाकाबंदी

शहराला जोडणाऱ्या सात रस्त्यांवर नाकाबंदी

googlenewsNext

सांगोला शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. प्रशासनाकडून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करून १ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र अत्यावश्यक सेवेतील आस्थापना स. ७ ते ११ पर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे सांगोला शहरात विविध कारणांवरून येणाऱ्या नागरिकांची संख्या व मोकाट फिरणाऱ्यांमुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत आहे.

सांगोला नगर परिषदेकडून वंदे मातरम् चौक, मिरज रोड, कडलास रोड, वाढेगाव रोड, पंढरपूर रोड, सावे रोड, वासुद रोड अशा ७ ठिकाणी बॅरिकेटिंग उभी करून नाकाबंदी केली आहे. यामुळे शहरात विनाकारण येणाऱ्या नागरिकांवर नियंत्रण राहील. पर्यायाने शहरातील गर्दी कमी होऊन कोरोना प्रसारास आळा बसेल, या हेतूने ही नाकाबंदी केली आहे.

कोट ::::::::::::::::::

पुढील टप्प्यात या तपासणी नाक्यावर कोरोना चाचणी करूनच नागरिकांना शहरात सोडण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. नागरिकांच्या सकारात्मक सहकार्याने सांगोला शहर कोरोनामुक्त करण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध आहे.

- कैलास केंद्रे,

मुख्याधिकारी - सांगोला

फोटो ओळ :::::::::::::::::::

सांगोला नगर परिषदेमार्फत शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली आहे.

Web Title: Blockade on seven roads connecting the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.