अक्कलकोटमध्ये २३५ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:36 AM2021-05-05T04:36:45+5:302021-05-05T04:36:45+5:30
फिजिकल डिस्टन्स, मास्क व शासनाच्या नियमांचे पालन करीत रक्तदात्यांनी शिबिराला प्रतिसाद दिला. स्नेहलोक युथ फाउंडेशनच्या माध्यमातून अक्कलकोट, जेऊर, सलगर ...
फिजिकल डिस्टन्स, मास्क व शासनाच्या नियमांचे पालन करीत रक्तदात्यांनी शिबिराला प्रतिसाद दिला. स्नेहलोक युथ फाउंडेशनच्या माध्यमातून अक्कलकोट, जेऊर, सलगर व उडगी येथे रक्तदान शिबिर घेतले. या चार ठिकाणी मिळून २३५ जणांनी रक्तदान केले.
याप्रसंगी नागनाथ सुरवसे, माजी झेडपी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड, शिवप्पा देसाई, माजी सरपंच महांतेश पाटील, स्नेहलोक युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिराया पाटील, सरपंच पार्वती झंपले, शिवाजी कलमदाणे, ग्रामपंचायत सदस्य सिद्धाराम कापसे, दरेप्पा कोळी, चंद्रकांत तळवार, बशीर अत्तार, सुरेश गवळी, देविदास शिंगे, मल्लिनाथ भासगी, अभिजीत लोके, पिंटू कालिबत्ते उपस्थित होते.
फोटो ओळ
०४अक्कलकोट-रक्तदान शिबिर
जेऊर येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नागनाथ सुरवसे, मल्लिकार्जुन पाटील, डॉ.संतोष गायकवाड, शिवप्पा देसाई, महांतेश पाटील, अध्यक्ष काशिराया पाटील, सरपंच पार्वती झंपले, शिवाजी कलमदाणे आदी.