पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ३१४ जाणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:14 AM2021-07-24T04:14:57+5:302021-07-24T04:14:57+5:30
अक्कलकोट : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कै. पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त ३१४ जणांनी रक्तदान केले. शुक्रवारी ...
अक्कलकोट : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कै. पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त ३१४ जणांनी रक्तदान केले.
शुक्रवारी हसापूर रोडवर लोकापुरे मल्टिपर्पज हॉल येथे हे शिबिर पार पडले.
या शिबिराचा शुभारंभ भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या हस्ते झाले. अविनाश महागावकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, अप्पासाहेब पाटील, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, भीमाशंकर इंगळे, महेश हिंडोळे, सिद्धाराम हेले, विवेकानंद उंबरजे, राजकुमार बंदीछोडे, गुंडप्पा पोमाजी, अमर पाटील, मल्लिनाथ स्वामी, प्रभाकर मजगे, राजशेखर मसूती, अविनाश मडीखांबे, काशीनाथ प्रचंडे, आणप्पा बाराचारी, उत्तम गायकवाड, रामेश कापसे, सुधीर मचाले, बाबा टक्कळकी, ऋषी लोणारी, रमेश उप्पीन, दयानंद बिडवे, पंडित कोरे, विजयकुमार ढोपरे, प्रदीप जगताप, श्रीसैल ठोंबरे, दयानंद बमनळळी, परमेश्वर यादवाड, वकील विजय हर्डीकर, आणप्पा याबाजी, विश्वनाथ इटेनवरू, जेऊरचे हुक्केरी, खंडप्पा वग्गे, स्वामीनाथ नागुरे, मिलन कल्याणशेट्टी, नागराज कुंभार, दयानंद उंबरजे, गोपू मेळकुंदी उपस्थिती दर्शवीत कै. कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
या शिबिरासाठी बाळा शिंदे, चंद्रकांत दसले, नागराज कलशेट्टी, धनंजय गाढवे, वसीम मुल्ला, मल्लिनाथ आळगी, गुरुपाद आळगी, मल्लिनाथ मजगे, प्रीतम पवार, बालाजी पाटील, सिद्धाराम टाके, सचिन पाटील, आतिष पवार, अंकुश चौगुले, संजय राठोड, शिवशंकर स्वामी, आकाश काडरामे, दिनेश तळवार, यांच्यासह मिलन व सागर कल्याणशेट्टी मित्रमंडळी, स्वामी विवेकानंद पतसंस्था, मल्टिस्टेट, कर्मचारी वृंद परिश्रम घेतले.
--
रक्तदान शिबिरासाठी डॉ. हेगडेवार, सिद्धेश्वर रक्तपेढी, मेडिकेअर रक्तपेढी सोलापूर आशा तीन रक्तपेढ्यांनी सहकार्य केले. रक्तदान शिबिर आयोजित करायचे यंदाचे सहावे वर्ष होते.
----
फोटो : २३ कल्याणशेट्टी
कै. पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन करताना शहाजी पवार, आमदार सचिन कल्याणशेट्टी, अविनाश महागावकर, अप्पासाहेब पाटील.