मोहाेळमध्ये ८० जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:24 AM2021-02-24T04:24:43+5:302021-02-24T04:24:43+5:30
मोहोळ : शिवसेनेचे माजी ग्रामपंचायत सदस्य ब्रह्मदेव गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या शिबिरात ८० दात्यांनी रक्तदान केले. या ...
मोहोळ : शिवसेनेचे माजी ग्रामपंचायत सदस्य ब्रह्मदेव गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या शिबिरात ८० दात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते झाले. अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड, मोहोळ नागरी पतसंस्थेचे चेअरमन कौशिक गायकवाड, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, भाजपचे संजय क्षीरसागर, पद्माकर देशमुख, प्रभाकर डोके, प्रवीण डोके, मराठा सेवा संघाचे समन्वयक संतोष गायकवाड, नगरसेवक सत्यवान देशमुख, अमोल गायकवाड, शिवसेनेचे संघटक नागेश वनकळसे, काकाराजे भोसले, चंद्रकांत वाघमोडे, रणजित भोसले, रणजीत गायकवाड, सचिन चव्हाण, भय्या आंडगे, महावीर डोके, नागनाथ गायकवाड उपस्थित होते.
---
फोटो : २३ मोहोळ ब्लॅड
रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, शाहीर राजाराम वाघमारे, प्रभाकर डोके.