खुडूस येथे रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:21 AM2021-04-18T04:21:23+5:302021-04-18T04:21:23+5:30
पिलीव येथे राजेबागेश्वर उरूस माळशिसर : पिलीव राजेशबागेश्वर उरूस साधेपणाने साजरा करण्यात आला. काेरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रमांना फाटा देत ...
पिलीव येथे राजेबागेश्वर उरूस
माळशिसर : पिलीव राजेशबागेश्वर उरूस साधेपणाने साजरा करण्यात आला. काेरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रमांना फाटा देत हा उरूस साजरा करण्यात आला. यावेळी मौला मुजम्मिल तांबोळी, बशीर शेख यांनी विधी पार पडले. आमिनखान पठाण, वाजिद शेख, समीनखान पठाण, साजिद शेख, जिशान शेख, अजीम अतार, अरमान शेख आदी मान्यवर याप्रसंगी होते. या धार्मिक विधीनंतर राजेबागेश्वर उरूसनिमित्त प्रसाद वाटप करण्यात आला.
वेळापुरात डॉ. आंबेडकरांना अभिवादन
माळशिरस : घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस वेळापूरचे सरपंच विमल जानकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी गटनेते पांडुरंग मंडले, अतुल पवार, नागेश नाईकनवरे, तुपे आणि वेळापूर ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
अरळीत ५२ जणांनी केले रक्तदान
मंगळवेढा : तालुक्यात अरळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ५२ जणांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी सुधाकर कोळी, गणेश ढाणे, रमेश नकाते यांनी परिश्रम घेतले. यावेळी मंडळाचे सखाराम सावंत, सरपंच मल्लिकार्जुन भांजे, विलास सावंत, राजकुमार सावंत, रमेश भांजे आदी उपस्थित होते.
वाळूज येथे कोरोनाने दोघांचा बळी
वाळूज : मोहोळ तालुक्यात वाळूज येथे कोरोनाने दोन पुरुषांचा सोलापूर येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव मोहोळ तालुका आणि परिसरात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. परंतू नागरिक विनामास्क आणि सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत आहेत. त्यामुळे प्रशासनाने येथे लक्ष देण्याची गरज आहे. दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे येथील सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. संसर्ग कसा टाळावा. या विषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ़. संदेश कादे, डॉ. प्रियदर्शनी कादे, डॉ. सरपंच प्रियंका खरात यांनी मार्गदर्शन केले.
पिलीवमध्ये विविध उपक्रमांनी
डॉ. आंबेडकरांना अभिवादन
माळशिरस : तालुक्यात पिलीव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विविध उपक्रमांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायत, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बँका, महावितरण, पोलीस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच नितीन मोहिते-माळी, उपसरपंच संजय आर्वे, रघुनाथ देवकर, सुधीर वाघमारे, रणजित सातपुते उपस्थित होते.
आंदोलनानंतर मायनर फाट्याला आले पाणी
माळशिरस : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी नीरा उजवा कालवा वेळापूर शाखेला निवेदन देऊन कार्यालयासमाेर आंदोलन छेडताच मायनर फाट्याला पाणी आले. मिलिंद सरतापे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. नीरा उजव्या कालव्याकडे वेळापूर उपविभागीय सहाय्यक अभियंता यांनी या आंदोलनाची दखल घेतली. या आंदोलनात महादेव ताटे, शरद साबळे, अजित साठे, स्वप्नील सरवदे, संजय पनासे, राहुल सराटे उपस्थित होते.
कुर्डूवाडीत कोरोनासाठी फिरते ॲम्ब्युलन्स
कुर्डूवाडी : कोरोनाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कुर्डूवाडीत कोरोना टेस्टसाठी फिरते ॲम्ब्युलन्स प्रत्येक वॉर्डात उपलब्ध करण्यात आली. यामाध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात आली. मुख्याधिकारी समीर भूमकर, स्वच्छता निरीक्षक तुकाराम माने, विष्णू पायगन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
अंकिता शिंदे जिल्ह्यात प्रथम
सांगोला : जवळा येथील कै. सौ. वत्सलादेवी देसाई विद्यालयातील बारावीची विद्यार्थिनी अंकिता शिंदे हिने विद्याधन फाउंडेशन अंतर्गत सत्यमेव जयते वॉटर कप स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत जिल्ह्यातून १,४९२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेंतर्गत अंकिताला ७५ हजारांची शिष्यवृत्ती भेटणार आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, प्राचार्य बी.एस. शिंदे, उपप्राचार्य कुलकर्णी यांनी कौतूक केले.
वाळूज येथे कोविड लसीकरणाला सुरुवात
वाळूज : मोहोळ तालक्यात वाळूज येथे ५२ जणांना कोविड लस देण्यात आली. यावेळी लसीकरण केंद्राचे उद्घाटन माजी सभापती सुशांत कादे यांच्या हस्ते झाले. प्रारंभी प्रथमत : ५८ जणांची कोरोना रॅपिड टेस्ट घेतली. सर्व अहवाल निगेटिव्ह आले. नंतर ४५ वयोगटावरील स्त्री -पुरुष यांना लस देण्यात आली. सर्वप्रथम गावच्या सरपंच डॉ. प्रियंका खरात यांनी ही लस घेतली. यावेळी नरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. किरण बंडगर, डॉ . गणेश खरात, माजी सभापती सुशांत कादे, डॉ. शंकर झेंडे, आरोग्य सेविका जे.आर. शेख, ग्रामसेवक मानसिंग जाधव, आशा वर्कर भारती नगूरकर, वंदना कादे, सुमन कुंभार यांनी परिश्रम घेतले.