लोकमतच्या रक्तदान महायज्ञात कुर्डूवाडीकरांनी जपलं रक्ताचं नातं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:26 AM2021-07-14T04:26:06+5:302021-07-14T04:26:06+5:30

कुर्डूवाडी : ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात सोमवारी दिवसभर कुर्डूवाडीकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मोठे योगदान दिले. रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग नोंदवत ...

Blood donation of Lokmat | लोकमतच्या रक्तदान महायज्ञात कुर्डूवाडीकरांनी जपलं रक्ताचं नातं

लोकमतच्या रक्तदान महायज्ञात कुर्डूवाडीकरांनी जपलं रक्ताचं नातं

Next

कुर्डूवाडी : ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात सोमवारी दिवसभर कुर्डूवाडीकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मोठे योगदान दिले. रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग नोंदवत लोकमतशी असलेलं आपलं रक्ताचं नातं जपलं आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने शहरातील व तालुक्यातील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी हे एकाच व्यासपीठावर आले .सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी लोकमतच्या या राज्यस्तरीय उपक्रमाचे कौतुक केले.

कुर्डूवाडी येथे पंचायत समितीच्या सभागृहात स्वातंत्र्यसेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व आम्ही कुर्डूवाडीकर यांच्या वतीने रक्तदानाचा महायज्ञ आयोजित केला होता. याचे उदघाटन उपविभागीय अधिकारी ज्योती कदम व माढ्याचे सभापती विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते झाले.

व्यासपीठावर उपसभापती धनाजी जवळगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष अमरकुमार माने, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, सहायक गटविकास अधिकारी प्रताप पाटील,शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या उपप्रमुख आशा टोणपे, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय टोणपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ताजी गवळी, डॉ. रोहित बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमात जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे, जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब उबाळे, नगराध्यक्ष समीर मुलाणी, माजी उपसभापती बंडूनाना ढवळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील- जामगावकर, आरपीआयचे नेते आकाश जगताप, शिवसेनेचे शहराध्यक्ष समाधान दास, नगरसेवक आनंद टोणपे, अरुण काकडे, चंद्रकांत वाघमारे, मनोज धायगुडे, रासपाचे शहराध्यक्ष अभिजीत सोलंकर, मनसेचे विधानसभा अध्यक्ष आकाश लांडे, भाजपचे संतोष क्षीरसागर, अमोल कुलकर्णी, सुधीर गाडेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, नायब तहसीलदार रवींद्र कदम, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, उपअभियंता एस.जे. नाईकवाडी, तालुका पशुधन अधिकारी डॉ. विक्रांत बागल, पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, डॉ. स्वाती बोबडे, मंडळ अधिकारी प्रदीप बांगर, आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक अतुल शिंदे, पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी सयाजी बागल, सतीश महिंगडे, वसीमभाई मुलाणी, जितेंद्र गायकवाड, विशाल मोरे, रेल कामगार सेनेचे वाहिद शेख, राज ढेरे, राजाभाऊ दणाणे, हरी भराटे, विशाल गोरे, अर्षद मुलाणी, अजित वायचळ यांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमासाठी कुर्डूवाडीकरांनी परिश्रम घेतले. या शिबिरात सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँक व कुर्डूवाडी ब्लड बँकेने सहकार्य केले

..................

फोटो :

Web Title: Blood donation of Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.