रक्तदान महायज्ञात मोहोळकरांनी जपलं रक्ताचं नातं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:18 AM2021-07-17T04:18:52+5:302021-07-17T04:18:52+5:30
मोहोळ : ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात शुक्रवारी दिवसभरात मोहोळकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत योगदान दिले. रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग नोंदवत लोकमतशी असलेलं ...
मोहोळ : ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात शुक्रवारी दिवसभरात मोहोळकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत योगदान दिले. रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग नोंदवत लोकमतशी असलेलं रक्ताचं नातं जपलं आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने शहरातील व तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी हे एकाच व्यासपीठावर आले. सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी लोकमतच्या या राज्यस्तरीय उपक्रमाचे कौतुक केले.
मोहोळ येथील कै. शहाजीराव पाटील सभागृहात लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व आम्ही मोहोळकर यांच्या वतीने रक्तदानाचा महायज्ञ आयोजित केला होता. याचे उदघाटन आमदार यशवंत माने यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, उपनगराध्यक्ष, प्रमोद डोके, पंचायत समितीच्या सभापती रत्नमाला पोतदार, गटविकास अधिकारी गणेश मोरे, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, नगरसेविका सीमाताई पाटील, नगरसेवक अतुल गावडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, पंचायत समिती सदस्या सिंधूताई वाघमारे, विजय पोतदार उपस्थित होते.
दिवसभरात पोलीस निरीक्षक अशोक सायकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर, माजी झेडपी उपाध्यक्ष दीपक गायकवाड, शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले, संघटक नागेश वनकळसे, मराठा सेवा संघाचे संतोष गायकवाड, राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेचे प्राचार्य सुधीर गायकवाड, भाजपा मोर्चा प्रभारी जिल्हाध्यक्ष संजीव खिलारे, रिपाइंचे नेते हनुमंत कसबे, आनंद गावडे, राजाभाऊ सुतार, मिलिंद अष्टुळ, महेश देशमुख, विक्रांत देशमुख, सौदागर मोरे, रामचंद्र खांडेकर, सचिन फाटे, विजय कोकाटे, लखन कोळी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या शिबिरासाठी अश्विनी ब्लड बँकेचे नागार्जुन जिंकले, सोमनाथ बिराजदार,
डॉक्टर सुरेखा काडादी, राहुल बिराजदार, रेणुका देवकर, प्रियदर्शनी शिंदे यांनी परिश्रम घेतले. अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रासह शासकीय कर्मचारी यांनी देखील रक्तदानात सक्रिय सहभाग नोंदवला.
-----
रक्तदाते ए पॉझिटिव्ह
आनंद गावडे
महेश पवार
ओंकार महामुनी
सचिन कवठे
कैलास गंभीर
ऋषिकेश सरक
सलीम तांबोळी
महेश कोटीवाले
नागेश डांगे
प्रदीप माळी
प्रतीक मोरे
----
बी पॉझिटिव्ह
मल्लिकार्जुन नंदूरे
राम कांबळे
सीताराम कांबळे
विपुल गवळी
मयूर नेहरकर
नागनाथ मेंडगुदळे
शुभम कांबळे
भुवनेश गिराम
---
ए बी पॉझिटिव्ह
संतोष गायकवाड
विजयकुमार देशमुख
हणमंत कसबे
सोमनाथ माळी
नागनाथ गडेकर
----
ओ पॉझिटिव्ह
हरी नगरे
रमाकांत गुरव
अश्विन गुरव
संतोष बडगे
कैलास शिंदे
संजय भोसले
अशोक कांबळे
जगन्नाथ पासले
महेश नरखेडकर
गिरीधर शेंडगे
---
-ओ निगेटिव्ह
मयूर लिगाडे