रक्ताचं नातं जोडण्यासाठी बार्शीत रक्तदान महायज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:16 AM2021-07-02T04:16:09+5:302021-07-02T04:16:09+5:30
बार्शी : लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमाअंतर्गत ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल (बाबूजी) दर्डा यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात भव्य रक्तदान ...
बार्शी : लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमाअंतर्गत ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल (बाबूजी) दर्डा यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात भव्य रक्तदान महायज्ञ आयोजित केला आहे. बार्शी येथे ८ जुलै रोजी रक्ताचं नातं जोडण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवला जात आहे.
बाजार समितीच्या सौदे हॉलमध्ये हे शिबिर आयोजित केले आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत हे शिबीर सुरू राहणार आहे.बाजार समितीच्या सौदे हॉलमध्ये हे शिबिर आयोजित केले आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत हे शिबीर सुरू राहणार आहे.
लोकमत वृत्तपत्र समूह, आ. राजेंद्र राऊत मित्र परिवार, मॉर्निंग सोशल फाउंडेशन व दि बार्शी मर्चंट असो. यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केल्याची माहिती मॉर्निंग क्लबचे अध्यक्ष नगरसेवक विजय राऊत यांनी दिली.
भगवंत ब्लड बँकेच्या वतीने रक्तसंकलन केले जाणार आहे. त्यासाठी शशिकांत जगदाळे, संदीप बरडे यांचे प्रयत्न आहेत. आमदार राजेंद्र राऊत व बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मर्चंट असो. अध्यक्ष बाबासाहेब कथले, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव महेश करळे हे बाजार समितीतील सर्व व्यापारी, कामगार, मुनीम यांचे या शिबिरासाठी विशेष प्रयत्न आहेत.
बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांच्या नेतृत्वाखाली शहर व ग्रामीण भागातील युवक कार्यकर्तेही यात योगदान देत आहेत. प्रभागातील जबाबदारी नगराध्यक्ष असिफ तांबोळी व गटनेते दीपक राऊत यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
---