राज्यभरात रक्त महागलं! मात्र सोलापुरात दर ‘जैसे थे’; नातेवाइकांना दिलासा
By दिपक दुपारगुडे | Updated: March 26, 2023 16:49 IST2023-03-26T16:49:41+5:302023-03-26T16:49:56+5:30
प्लाझ्मा, प्लेटलेट्स यामध्ये कोणतीही दरवाढ झालेली नाही.

राज्यभरात रक्त महागलं! मात्र सोलापुरात दर ‘जैसे थे’; नातेवाइकांना दिलासा
सोलापूर - सार्वजनिक आरोग्य विभागाने शासकीय व अशासकीय रक्तपेढ्यांमार्फत रक्त व रक्त घटकांचे सुधारित प्रक्रिया शुल्काचे दर निश्चित केले आहेत. रक्त आणि रक्तामधील घटक यांच्या दरांमध्ये सरकारी रक्तपेढीत ५० रुपयांनी, तर खासगी रक्तपेढीत १०० रुपयांनी केली आहे. मात्र, सोलापुरातील खासगी रक्तपेढ्यांनी कोणतीही दरवाढ केलेली नाही. शहरातील रक्तपेढ्या अद्याप २०१४ मध्ये निश्चित केलेल्या दराप्रमाणेच विक्री करत असल्याचे दमाणी ब्लड बँकेचे अशोक नावरे यांनी सांगितले.
प्लाझ्मा, प्लेटलेट्स यामध्ये कोणतीही दरवाढ झालेली नाही. रक्त आणि रक्तातील घटकांच्या अतिरिक्त चाचण्यांसाठी लागणाऱ्या प्रक्रिया शुल्कामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही याच धर्तीवर सोलापूर शहरात दरामध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.
रक्ताचे आधीचे दर – नवे दर
सरकारी रक्तपेढी : १०५० रुपये – ११०० रुपये
खासगी रक्तपेढी : १४५० रुपये – १५५० रुपये
काय म्हणतात रक्तपेढी चालक?
शासनाने रक्तपेढ्यांमार्फत रक्त व रक्तघटकांचे सुधारित प्रक्रिया शुल्काचे दर निश्चित केले, सध्या मागणी कमी असल्यामुळे दरात वाढ केलेली नाही. -अशोक नावरे, गोपाबाई दमाणी ब्लड बँक, सोलापूर