एसटी बंदचा फटका; संधी हुकल्याने टीईटीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा ‘एक चानस हवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 10:57 AM2021-11-24T10:57:17+5:302021-11-24T10:57:21+5:30

 टीईटी परीक्षा झाली आता निकालाची प्रतीक्षा

Blow of ST closure; TET students want 'one chance' again | एसटी बंदचा फटका; संधी हुकल्याने टीईटीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा ‘एक चानस हवा’

एसटी बंदचा फटका; संधी हुकल्याने टीईटीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा ‘एक चानस हवा’

Next

सोलापूर : मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे न झालेली टीईटी परीक्षा यंदा रविवारी पार पडली. पण यंदा कोरोनानंतर एसटी संपामुळे अनेक विद्यार्थ्यांची संधी हिरावल्याचे मत विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यामुळेच सोलापुरातील जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसल्यामुळे हजारो विद्यार्थांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भावी शिक्षकांकडून होत आहे.

टीईटी पेपर क्रमांक एक या परीक्षेला डीएड, बीएड आणि पेपर क्रमांक २ पदवीधर होऊन बीएड झालेले विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. त्यांना गणित, बाल मानसशास्त्र, परिसर अभ्यास, इंग्रजी, मराठी या विषयांवर आधारित प्रश्न असतात. या दोन्ही परीक्षा या प्रत्येकी दीडशे मार्कांच्या असतात. या परीक्षांचा निकाल लागण्यापूर्वी ज्यांना परीक्षा देता आली नाही त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे, त्यांचे निकालाकडे डोळे लागले आहेत. तसेच ज्या उमेदवारांना कोणत्याही प्रश्नावर ऑब्जेक्शन असेल तर, ते परीक्षार्थी ऑनलाईन तक्रारी करून शकतात. यासाठी लवकरच तारीख कळवली जाईल असे मत जाणकारांनी व्यक्त केले.

एसटी संपाच्या काळात पहिल्यांदाच राज्यात परीक्षा घेऊन अनेकांना आर्थिक मानसिक त्रास दिला गेला. यामुळे अनेक विद्यार्थांना वेळेत परीक्षा केंद्रावर परीक्षेस जाता आले नाही. यास परीक्षा मंडळ व शासन जबाबदार असून याचा गांभीर्याने विचार करून परीक्षेपासून वंचित असलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी द्यावी.

- प्रशांत शिरगुर, डी.एड बी.एड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य

गाडीवरून परीक्षेला जाताना वाटेतच पावसात अडकलो. यामुळे परीक्षा केंद्रावर वेळेवर जाण्यासाठी खाजगी गाडी करावी लागली. यासाठी मला जादा पैसे मोजावे लागले. यामधून मला मानसिक आणि आर्थिक दोन्ही त्रास सहन करावा लागला. पुढच्या वेळेस परीक्षेचे नियोजन करताना योग्य नियोजन करून परीक्षा घ्यावी.

- सोमानिंग कमळे, परीक्षार्थी

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातून परीक्षेस येताना आम्हाला खूप अडचणी आल्या. यामुळे केंद्रावर पोहचण्यासाठी पण, उशीर झाला. यामुळे पुढील परीक्षांसाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, नाही तर, फक्त लाखो गरीब उमेदवारांचे आयुष्य बरबाद होईल. याला जबाबदार फक्त निष्काळजी सरकार असेल.

- दीपाली माने, परीक्षार्थी

पहिला पेपर दुसरा पेपर

  • नोंदणी केलेले विद्यार्थी ९४३३ ... ८४७१
  • उपस्थित   ८०२३ ...     ७३०४
  • अनुपस्थित   १४१० ... ११६७

 

उमेदवारांना खासगी गाड्यांचा आधार

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे राज्य शासनाने विविध स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रकात बदल केले आहे. पण, डीएडच्या परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये पूर्वीच तीन ते चार वेळा बदलण्यात आल्यामुळे यंदा बंद स्थितीतच घेण्यात आले. तसेच परीक्षा केंद्र या शहरात असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येण्यासाठी खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागला. यामुळे अनेक उमेदवारांना परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचता आले नाही.

इंग्रजीने काढला घाम

वेळापत्रकात अनेकवेळा बदल केल्यानंतर परीक्षा घेण्यात आल्या. यामुळे उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पण, परीक्षा देताना परीक्षेतील प्रश्न पाहून अनेकांना उत्तरेच सुचेनासे झाले. यात इंग्रजी विषयाचा पेपर जास्त अवघड असल्याची चर्चा उमेदवारांमध्ये होत होती.

Web Title: Blow of ST closure; TET students want 'one chance' again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.