नाव बसस्थानक; मात्र खड्डे, घाणीच्या साम्राज्यासह बनलंय खासगी वाहनतळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:26 AM2021-09-24T04:26:12+5:302021-09-24T04:26:12+5:30
एसटी बस सर्वसामान्यांचं हक्काचं वाहन. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सहाजिकच बसस्थानकांवरही नागरिकांची वर्दळ कायम असते. सध्या परिसरात ...
एसटी बस सर्वसामान्यांचं हक्काचं वाहन. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सहाजिकच बसस्थानकांवरही नागरिकांची वर्दळ कायम असते. सध्या परिसरात अस्वच्छता, वाढलेले गवत, मोठमोठे खड्डे असल्यामुळे पाणी साचून राहत आहे. हे ये-जा करणाऱ्या बस व नागरीकांसाठी त्रासदायक ठरत आहे. याशिवाय परिसरात दररोज उभी असणारी वाहने लक्षवेधी ठरत आहेत. नावाला बसस्थानकाचा बोर्ड असला तरी बसस्थानक सध्या खासगी वाहनांचे वाहनतळ असल्याची प्रचिती येताना दिसत आहे.
नो पार्किंगलाही विळखा
माळशिरस बसस्थानक परिसरात नो पार्किंग म्हणून लावलेल्या फलकाच्या बाजूनेच मोटारसायकलींचे पार्किंग होत आहे. याबाबत या गोष्टींकडे बसस्थानकातील कंट्रोलर, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. उलट पार्किंगबाबतचा चेंडू पोलिसांकडे ढकलला जात आहे.
कोट ::::::::::::::::
बसस्थानकाची स्वच्छता एजन्सीमार्फत होते. त्यामुळे बसस्थानक स्वच्छ आहे. याशिवाय परिसरात पाऊस उघडताच तणनाशक मारले जाते. वाहनांबाबत आम्ही पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे.
- तानाजी पवार, डेपो मॅनेजर, अकलूज