पिंपळगावच्या सरपंचपदी बोधले; उपसरपंच भडकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:40 AM2021-03-04T04:40:41+5:302021-03-04T04:40:41+5:30
पिंपळगाव (पान) ग्रामस्थांनी हेवेदेवे विसरून ४० वर्षानंतर प्रथमच गावची निवडणूक बिनविरोध केली. सरपंच व उपसरपंच निवड प्रक्रियेत सरपंचपद हे ...
पिंपळगाव (पान) ग्रामस्थांनी हेवेदेवे विसरून ४० वर्षानंतर प्रथमच गावची निवडणूक बिनविरोध केली. सरपंच व उपसरपंच निवड प्रक्रियेत सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्यामुळे आणि बालिका बोधले यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे बिनविरोध निवडून आल्या. उपसरपंचपदासाठीही हरिश्चंद्र भडकवाड यांचा एकच अर्ज असल्यामुळे ते ही बिनविरोध झाले.
यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे. पी. माने., ग्रामसेवक धर्मे होते. यावेळी निवडीच्या ग्रामपंचायत सदस्य, बाळासाहेब पिसाळ, विजयकुमार पाटील, प्रज्ञा गुंड, सुवर्णा जाधव, गवळण कुंभार. सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर गावातील ग्रामस्थांनी नूतन सरपंच, उपसरपंचाचा सत्कार केला. यावेळी रामेश्वर पाटील, पंकज पिसाळ, धनाजी भंगुरे, महेश गुंड, स्वप्नील पाटील, रामचंद्र पिसाळ, डॉ. हनुमंत यमगर, अनिल भडकवाड, अशोक भडकवाड, लक्ष्मण जाधव, सचिन जाधव, योगेश लोंढे, विनायक बोधले, केतन बोधले, महेश पिसाळ, बाळासाहेब गुंड, अमोल पिसाळ, राजेंद्र पिसाळ, प्रमोद पिसाळ, सोमनाथ ढाळे,नाना राऊत उपस्थित होते.
-----